;भिडे वाड्याचे स्मारक होण्यासाठी महाधिक्यांनी बाजू मांडावी ;

Share:


 ;भिडे वाड्याचे स्मारक होण्यासाठी महाधिक्यांनी बाजू मांडावी ;


पुणे , दि २६ - मुलींची पहिली शाळा  ज्या ठिकाणी भरली होती , त्या ; भिडे वाड्याचे ; स्मारक होण्यासाठी पालिकेच्या आणि शासनाच्या बाजूने महाधिवक्तांनी न्यायालयात बाजू मांडावी . राज्य शासनाने तशा सूचना द्याव्यात अशी विनंती करण्याकरिता महापालिका शासनाला आणि महाधिवक्त्यांना पत्र देणार आहे . 
या सोबतच पालिकेच्या पुरातत्व विभाग आणि बांधकाम विभागाने समन्वयाने काम करून धोकादायक झालेला हा वाडा रिकामा करून घ्यावा असेही सोमवारी याविषयावर बोलविण्यात आलेल्या बैठकीमध्ये ठरले

भिडे वाड्याचे स्मारक होण्यामध्ये नेमक्या काय अडचणी आहेत . यासंदर्भात चर्चा करण्यासाठी नगरसेवक ससाणे आणि प्रभारी आयुक्त तथा अतिरिक्त आयुक्त [ ज . ] रुबल अग्रवाल यांच्या कक्षात बैठक बोलावली होती . या बैठकीला भूसंपादन , विधी , बांधकाम आणि हेरिटेज विभागाचे अधिकारी उपस्थित होते .

भिडे वाड्याचे दोन मालक , न्यायालयामध्ये गेलेले  असून 
सद्या हे प्रकरण उच्च न्यायालयामध्ये आहे .

भिडे वाड्याची इमारत जीर्णावस्थेत असून मोडकळीस आलेली आहे , या ठिकाणी राहणारे भाडेकरू , पोटभाडेकरू आणि मालकांनाही यापूर्वी पालिकेने नोटीसा बजावलेल्या आहेत .
बैठकीमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया , हेरिटेज विभागाचे नियोजन आणि न्यायालयातील सद्यस्तिथी या विषयी चर्चा करण्यात आली .

संकलन : सचिन डावरे ,

http://www.bhidewada.com/


No comments