आचरणयुक्त बौद्ध हवा !

Share:


आचरणयुक्त बौद्ध हवा !



डॉ । बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी आपल्याला बुद्धधम्माची दीक्षा दिली आणि दीक्षा देत असतांना त्यांनी आपल्याला प्रतिज्ञदेखील दिलेल्या आहेत . जर आपण त्या प्रतिज्ञांचे पालन करत नाहीत तर याचा अर्थ स्पष्ट आहे कि , 
आपण आपल्या उद्धारकर्त्याशी बेईमानीकरीत आहोत । 
त्यांचा अपमान करीत आहोत , व .
आपण फक्त आपल्या स्वार्थासाठी त्यांचा उपयोग करत आहोत ।
म्हणून बौद्धांनी , बहुजनांनी दिवाळी हा सण साजरा करू नये ।
बुद्धधम्म हा वैज्ञानिक धम्म आहे , तो आचरणावर अवलंबून आहे । परंतु  बरेचदा बुद्ध म्हणवणून घेणारे स्त्री - पुरूष बुद्धधम्माच्या तत्वाप्रमाणे वागताना दृष्टीस पडत नाहीत .
       आम्ही १९५६ ला बुद्धधम्माची दीक्षा घेऊनही आमच्यात हिंदू धर्माचे सण होत असतील तर हि आमची शोकांतिका नव्हे का ?

आम्ही आमच्या लहान मुलाना कळत - नकळत विषमतावादी हिंदू संस्कृतीचे संस्कार देत आहोत .


 मुलांना इतिहास कळला पाहिजे , त्यांनी आपल्या आईवडिलांना विचारले पाहिजे कि ; आम्ही दिवाळी , होळी , मकर संक्राती हे सण साजरे का करीत नाही ?
त्या दिवशी काय घडले ? हा इतिहास पालकांना , आईवडिलाना , आपल्या मुलामुलीना , नातवंडांना सांगता आला पाहिजे . 
त्यासाठी घराघरात आमच्या भगिनींनीं बौद्ध साहित्य वाचले पाहिजे .
कारण स्त्रीच संसाराची जननी आहे .

ती कुटुंबाचाच नव्हे तर येणाऱ्या नवपिढीचा , प्रबुद्ध समाजाचा , व पर्यायाने देशाचा , राष्ट्राचा आधारस्तंभ असते .

दिवाळी बौद्धांनी का साजरी करू नये ? 


त्याचे पहिले कारण :- तथागत गौतम बुद्धांच्या श्रावक संघाचे दोन श्रेष्ठ सोबती सारीपुत्त सेनापती आणि महामोगल्ल्यांनं हे उपसेनापती होते . त्या दोघांचा अस्सीम त्याग , 
वर्षाची धम्मसेवा आणि त्यांच्या अंगी असलेले सद्गुण यामुळेच तथागतांनी त्यांच्या खांद्यावर संघाची धुरा सोपविली होती . त्यामुळंच कार्तिक अमावस्येला इसिगल पर्वतावर त्यांची क्रूर हत्या करण्यात अली . महामोगलल्यानंला जिवंत जाळण्यात आले .
तो दिवस दिवाळीचा होता , म्हणजे बौद्धांसाठी हा इतिहासातील काळा दिवस होय ।।

दुसरे कारण :- मौर्य काळातील दहावा सम्राट बौद्ध राजा बहुदरथ हा , दहा व्यक्तींचे बळ असलेला महापराक्रमी अजिंक्य योद्धा होता . 
युद्धात त्याला हरविणे कठीण काम होते , यांची ब्राह्मणी सेनापती पुष्यमित्र शुंग याने कपट कारस्थानाने क्रूर हत्या केली .
तोही दिवस , कार्तिक अमावास्येचा होता . 

बौद्ध सत्ता उलथून लावण्यात अली ।
भिक्खुंच्या कत्तली करण्यात आल्या ,
  
       भिक्खूंचे शीर कापून  अणणार्यास सुवर्ण मुद्रा देण्याचे फर्मान पुष्यमित्र शुंग याने सोडले , विहारे , स्तूप नष्ट केली आणि दिव्यांच्या माळालावून आतिषबाजी  केली . तो दिवस कार्तिक अमावास्येचा [ दिवाळी ] होता ..

तिसरे कारण :- ; इडा पीडा टळो , बळीचे राज्य येवो ; हि म्हण आजही आपल्या माता - भगिनीं  एखाद्या प्रिय व्यक्तीला ओवाळताना म्हणतात .
या मागे फार , मोठा इतिहास आहे ।।

    बहुजनांचा सर्वश्रेष्ठ  राजा बळी हा अत्यंत शूर , पराक्रमी , बुद्धिमान , सत्वशील , चारित्र्यवान , उदार , दयाशील , न्यायी असा सर्वगुण संपन्न राजा होता .

त्याच्या राज्यात सर्वसामान्य बहुजन समाजातील जनता अत्यंत सुखी - संपन्न व समृद्ध होती .


अश्या या दानशूर राजाला विष्णूने कपट कारस्थान रचून कैद केले .

त्यांची सत्ता , शास्त्रे , विद्या , संपत्ती हिरावून घेण्यात अली .


बलिप्रतिपदा या दिवशी बळी  राजाची क्रूर हत्या करण्यात अली , तो दिवस कार्तिक अमावास्येचा म्हणजेच दिवाळीचा होता .

म्हणून बौद्धांनो , 

बहुजनांनी दिवाळी हा सण साजरा करू नये . आजवर आपण  जे काही 
करत आलो त्यात आपले अज्ञान होते , परंतु आतातर आपल्याला खरा इतिहास समजलेला आहे आणि हा खरा इतिहास समजून देखील आपण जर परत तीच चूक करत असाल , तर मात्र आपल्याला बौद्ध म्हणवून घेण्याचा काही एक अधिकार नाही .


कारण ; डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी आपल्याला बुद्धधम्माची दीक्षा दिली आणि दीक्षा देत असतांना त्यांनी आपल्याला प्रतिज्ञांदेखील दिलेल्या आहेत .

जर आपण त्या प्रतिज्ञांचे पालन करीत नाहीत , तर याचा अर्थ स्पष्ट आहे ; कि आपण आपल्या उद्धारकर्त्याशी बेईमानी करत आहोत ...
त्यांचा अपमान करत आहोत व आपण फक्त आपल्या स्वार्थासाठी त्यांचा उपयोग करत आहोत ।

म्हणून बौद्धांनी , बहुजनांनी दिवाळी हा सण साजरा करू नये ..

घरावर विद्युत रोषणाई करणे , आकाश कंदील लावणे , दिवे लावणे , 
रांगोळी काढणे , म्हणजे आपल्या पूर्वजांच्या , महापुरुषांच्या हत्येचा आनंदोत्सव साजरा केल्यासारखे होईल .


तसेच होळी , मकर संक्रात , व इत्तर काही हिंदूंचे जे सण त्या प्रत्येक सणांशी आपल्या नाशाचे कारण आहे . 

आपण इतिहास वाचला पाहिजे ।

आपली संस्कृती जाणून , समजून घेतली पाहिजे ।

आपण बौद्ध आहोत , आपली संस्कृती वेगळी आहे ।

आपले सण म्हणजे  भीमजयंती , बुद्धजयंती , धम्मचक्र प्रवर्तन दिन , व 
आपल्या आदर्शांच्या जयंत्या ,
आणि प्रत्येक महिन्याची पौर्णिमा हे आहेत ।

   तेच फक्त साजरे करावेत ।।



- लेखक : माया दामोदर / ८८८८६७४२६१ 
संकलन  : सचिन डावरे ,
आभार ; दै सम्राट ..

No comments