१९५६ च्या ,.. धम्मदीक्षेचे मर्म !

Share:

                                    

                                          १९५६ च्या
                              धम्मदीक्षेचे मर्म
   
               

१९५६ च्या धम्मदीक्षेचे मर्म हे आहे कि , डॉ , बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केलेल्या चळवळीचे ते शिखर होते. ; आमचा लढा हा इज्जतीसाठी आहे , लाभासाठी नाही . आम्ही मानवाला पूर्णत्वास नेण्यासाठी धडपडत आहोत , : असे त्यांनी म्हटले आहे . इतिहासाची एकाशब्दात व्याख्या करताना ते म्हणतात इतिहास म्हणजे ..बदल .,   १९५६ च्या धम्मदीक्षेने इतिहास घडविला म्हणजे .. बदल ., घडविला .प्रतिक्रांतीने निर्माण केलेली दीड हजार वर्षाची निराशाजनक परिस्थिती बदलून डॉ . बाबासाहेबानी इतिहास घडिवला .  बुद्धांच्या धम्माची भारतात पुनर्स्थापना  करून पुन्हा क्रांती केली , या क्रांतीने प्रतिक्रांतीला  चोख उत्तर दिले .             

भारताच्या अडीच - तीन हजार वर्षाच्या इतिहासातील एक महत्वाची घटना म्हणजे १९५६ ची धम्मदीक्षा होय . नागपूर येथे दि . १४ ऑक्टोबर १९५६ रोजी हि ऐतिहासिक घटना घडली , खरेतर त्या प्रसंगीं धर्मांतर आणि धम्मदीक्षा या दोन महत्वाच्या घटना घडल्या होत्या . हिंदू धर्माचा त्याग आणि बुद्धधम्माचा स्वीकार या त्या दोन घटना होत्या .

                          महामानव डॉ , बाबासाहेब आंबेडकर यांच्या खंबीर   नेतृत्वाखाली उपस्थित असलेली जनता त्या प्रसंगात सहभागी  झाली होती . त्यावेळी उपस्थित असलेले सरदार वल्लिसिंग यांनी आपण स्वतः त्या महान प्रसंगाचे साक्षीदार होतो , असे म्हटले आहे . इतका मोठा जनसागर एकत्र आलेला आपण पहिल्यांदाच पहिला , असे ते म्हणतात . 
दूरवर नजर जाईल तेथपर्यंत माणसांच्या डोक्याचे काळे ठिपके दिसत होते , आणि तितक्यात दूरवरून एकामागून एक येणाऱ्या घोषणांच्या लाटांवर लाटा उसळत होत्या .

क्रांती आणि प्रतिक्रांती यामधील झगड्याचा इतिहास म्हणजे भारताचा इतिहास आहे . असे डॉ.बाबासाहेब म्हणतात . 
समाजातील दोष घालविणे म्हणजे समाजसुधारणा करणे होय .

पूर्वीच्या काळी धर्म आणि शास्त्रे यांचे समाजावर वर्चस्व होते , त्या धर्म व शास्त्रांनी प्रस्थापित केलेली सामान व्यवस्था बंधिस्त होती . तेथे विचारस्वातंत्र्याला वाव नव्हता . 

       अशा काळात भारतात तथागत बुद्धांचा उदय झाला . त्यांनी म्हटले कि , जी गोस्ट माणसाचे मन निर्माण करते , ती गोस्ट ते मन नष्ट हि करू शकते .
बुद्धांनी माणसाची विचारशक्ती जागी केली . धर्म आणि शास्त्राला जे पटते ते नव्हे तर बुद्धीला पटते ते खरे . असे बुद्धानी म्हटले .
वेद , यज्ञ आणि वर्ण यावर आधारित धर्माला त्यांनी शह दिला आणि प्रज्ञा व करून यावर आधारित ; धम्माचा ; मार्ग दिला .
बुद्धांनी आपला धम्म काही थोडक्या लोकांसाठी नसून तो खूप साऱ्या लोकांसाठी म्हणजे बहुजनांच्या हिता - सुखासाठी आहे , असे सांगितले .

जनमानसात हा धम्म लोकप्रिय झाला आणि भारतात झालेली ती प्रथम धम्मक्रांती ठरली .बुद्धकाळानंतर सम्राट अशोकाच्या काळात या धम्माचा  प्रचार आणि प्रसार भारताबाहेरील देशातही झाला . कोणत्याही जोर जबरदस्तीने ,  शस्त्राच्या धाकाने किंवा कायद्याच्या बडग्याने हा प्रचार प्रसार झाला नव्हता .

बुद्धांच्या धम्माचा भर मानपरिवर्तनावर होता , त्या मुळे विषमतावादी समाजव्यवस्था जोपासणाऱ्या धर्म व शास्त्रे यांची पाळेमुळे पूर्णपणे नष्ट झाली नव्हती . सम्राट अशोकाच्या नंतरच्या काळात संधी मिळताच ती पाळे मुळे वर डोके कडून आली 
आणि ती फोफावली . त्याच वेळी त्यांनी बुद्धांच्या धम्मावर हल्ला केला ,
धम्माचा विध्वंस केला . भारतातून धम्म नामशेष होण्याइतके प्रचंड नुकसान त्या प्रति क्रांतीने केले .
     मागील अडीच हजार वर्षात सुमारे १२०० वर्षे बुद्धांचा धम्म भारतात होता व नंतरच्या काळात तो धम्म भारतातून हद्दपार केला गेला होता ,
याचा परिणाम म्हणजे भारतात पुन्हा विषमतावादी समाजव्यवस्था दुढ झाली होती . पुढे जाऊन तिचे जातीव्यवस्थेत रूपांतर होऊन तिने असपृयश्यतेचे रौद्र रूप धारण केले होते .

माणुसकीला काळिम्बा फासणाऱ्या समाजव्यवस्थेच्या या एकंदर परिस्थितीच्या काळात भारतात एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस एका बोधिसत्वाचा उदय झाला , त्यांचे नाव होते ,
डॉ . बाबासाहेब आंबेडकर .  

   डॉ . बाबासाहेबांनी म्हटले कि ,   


 धम्माची जरुरी गरिबांना आणि पिडीतांनाच जास्त असते ।
धम्म जर सत्त धम्म असेल , तर तो त्यांना जीवन जगण्याची उमेद देतो ।
चांगले दिवस येतील , असे सांगतो ।

पतितांना आपण पतित आहोत याची जाणीव झाल्यास पतितावस्थेतून बाहेर येण्यास ते धडपडतात व त्यात यशस्वी होतात .
                                         विषमतावादी समाजव्यवस्थेचे  चटके स्वतःच्या जीवनात सोसावेलागल्याने भारतातील असपृश समाजाची दुःखे काय आहेत ते ,
डॉ . बाबासाहेबांना चांगले माहित होते .
 परदेशातून शिक्षण घेऊन  भारतात आल्यावर डॉ . बाबासाहेबांनी असपृश्यतेच्या समस्ये विरुद्ध चळवळ उभी केली .
अस्पृश्यता हा आमच्या शरीरावर कलंक असून , तो  आम्हालाच काढून टाकला पाहिजे .
असे सांगून त्यांनी दबलेल्या , पिडलेल्या लोकांचा स्वाभिमान जागा केला .
संघटनेतून ऐक्य व ऐक्यातून त्या लोकांमध्ये धैर्य निर्माण झाले .                                     डॉ , बाबासाहेबांनी अनेक सत्याग्रह केले , कायदा मंजूर होऊनही समाज ते हक्क घेऊ देत नाही , तेव्हा त्या समाजाच्या मानसिकतेत बदल होत नाही , म्हणून आपली शक्ती आणि वेळ व श्रम वाया जाऊ ना देण्याचे त्यांनी ठरविले आणि धर्मांतर करणे हाच एक उपाय असल्याचे ते म्हणाले .

जेथे आपल्याला सामान न्याय , सामान मान , व सहानभूती मिळेल ! त्या धर्मात जाण्याचा विचार त्यांनी लोकांपुढे ठेवला . 

या घोषणेनंतर वीस वर्षे  त्यांनी लोकांचे प्रभोधन केले । जगातील इतर धर्माचा त्यांनी अभ्यास केला . सर्व धर्माच्या अभ्यासातून असे स्पस्ट झाले कि , सर्व धर्म ईश्वरवादी आहेत .

माणसाच्या जीवनातील दुःखाच्या समस्येवर त्यामध्ये कोणताही उपाय नव्हता .विषमतावादी समाजव्यवस्तेची समस्या हि फक्त भारतातच होती .

ज्या धर्मात समाजसुधारणेची सोय होती असा एकच धर्म होता , तो म्हणजे तथागत बुद्धांचा धम्म .

विषमतेत भेद - भाव असतो , स्वातंत्र्याचा अभाव असतो आणि ईर्षा व वैर असते . 
विषमतेच्या या समस्येवर उपाय एकच होता , तो म्हणजे समता , स्वातंत्र्य व बंधुता शिकविणारा बुद्धांचा धम्म ।

   देशातील सात कोटी लोकसंख्या असलेल्या एस सी - पीडित जनतेची सतत काळजी करणारे एकमेव नेते होते , ते म्हणजे डॉ . बाबासाहेब आंबेडकर . ते म्हणतात ,
मला या सात कोटी लोकांना या तीरावरून त्या तीरावर सुखरूप घेऊन जायचे आहे , या नावेचा मी नावाडी आहे . त्यामुळे माझ्यावर फार मोठी जवाबदारी आहे : 

दुसऱ्या एका प्रसंगी डॉ . बाबासाहेब म्हणतात ,
माझी जनता , हि माझी मेंढरे आहेत . व मी त्यांचा मेंढपाळ आहे , तेव्हा सध्यातरी माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या मागे चालावे ;


आणखी एकेठिकाणी डॉ . बाबासाहेब म्हणतात ,
माझी जनता आंधळी आहे , असे असले तरी मी त्यांच्या हातातील काठी आहे . त्यामुळे त्यांना न अडखळता मार्गक्रमण करता येणार आहे ;

डॉ . बाबासाहेबांनी बुद्धांच्या धम्माची निवड करून भारताच्या संस्कृतीचे नुकसान होणार नाही , याची काळजी घेतली व त्याचवेळी त्या जनतेच्या खऱ्या स्वातंत्र्याचा म्हणजे मानसिक स्वातंत्र्याचा मार्ग खुला करून दिला .

     १९५६ धम्मदीक्षेचे मर्म  हे आहे कि , 
डॉ । बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केलेल्या चळचळीचे ते शिखर होते । 

; आमचा लढा । हा इज्जतीसाठी आहे , लाभासाठी नाही ।।
आम्ही मानवाला पूर्णत्वास नेण्यासाठी धडपडत आहोत ; असे त्यांनी म्हटले आहे ।


इतिहासाची एका शब्दात व्याख्या करताना ते म्हणतात , 
इतिहास म्हणजे ।। बदल ; 

१९५६ च्या धम्मदीक्षेने इतिहास घडविला म्हणजे बदल घडवला ।

प्रतिक्रांतीने निर्माण केलेली डिड हजार वर्षाची निराशाजनक परिस्थिती बदलून डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी इतिहास घडविला ।।

बुद्धांच्या धम्माची भारतात पुनर्स्थापना करून पुन्हा क्रांती केली ।

या क्रांतीने प्रतिक्रांतीला चोख उत्तर दिले ।

 जागतिक पातळीवर या घटनेची दखल घेतली गेली । 
देशपातळीवर भारतात पुन्हा , बुद्धांचे नाव घेतले जाऊ लागले ,विस्मरणात गेलेल्या बौद्ध संस्कृतीचे पुनरुज्जीवन झाले ।
त्या संपन्न संस्कृतीचा वारसा हा आपल्या देशाचा अमोल ठेवा असल्याची 

जनतेला जाणीव झाली । सामाजिक व वैय्यक्तिक पातळीवर प्रत्येक व्यक्ती एक चांगला माणूस बनण्याची प्रक्रिया सुरु झाली .

खेडेगावातील तसेच शहरी गरीब वस्तीतील बुध्दविहारात , पाच वर्ष पासून दहा वर्ष वयाची लहान मुले - मुली त्रिशरण पंचशील , बुद्धवंदना इ । पाली गाथा तोंडपाठ म्हणू लागली ।

त्यांच्यातून सुसंस्कारित असा  युवा वर्ग आणि सुजाण नागरिक निर्माण होऊ लागला । 

डॉ । बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या : 
; बुद्ध अँड हिस धम्म ; या ग्रंथाचे वाचन , अभ्यास आणि चिंतन सुरु झाले ।


जसजसा काळ पुढे जाईल तसतसे  डॉ . बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीचे महत्व जगासमोर येईल ..


 आभार  : एम । एम  घाडगे / ९६१९९५३७७७ 

दै : सम्राट । १३ ऑक्टोबर 2019

No comments