फडणवीस सरकारच्या काळात जातीय तणावात वाढ
लोकनायक : हिंदू - मुस्लिम तणावाची जागा ; दलित - सवर्ण ; तणावाने
घेतल्याचा पोलीस खात्याचा ठपका
मुंबई / प्रतिनिधी : फडणवीस सरकारच्या काळात राज्यातील जातीय तणावात वाढ झाल्याचा अहवाल पोलीस खात्याने निवडणूक आयोगासमोर सादर केला आहे . हिंदू - मुस्लिम तणावाची जागा गेल्या पाच वर्षात दलित - सवर्ण तणावाने घेतली असल्याचे या अहवालात
म्हटले आहे .
बुधवार दि - १८ सप्टें रोजी , मुंबईत केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला होता . त्यात पोलीस खात्याने , राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात एक सादरीकरण केले आहे . ज्या मध्ये राज्यातील हिंदू - मुस्लिम तणावाची जागा गेल्या पाच वर्षात दलित - सवर्ण तणावाने घेतल्याचा अहवाल पोलीस खात्याने
निवडणूक आयोगाला दिला आहे .
हिंदू - मुस्लिम धर्मियांतील तणावासाठी राज्यातील ८ जिल्हे संवेदनशील म्हणून पोलिसानी निवडले आहेत , तर त्या तुलनेत दलित - सवर्णांमधील तणाव असलेल्या १४ जिल्ह्यांची नोंद करण्यात आली आहे .
पालघर , ठाणे , पुणे , सोलापूर , अहमदनगर , बुलढाणा , वाशीम आणि औरंगाबाद हे जिल्हे मुस्लिम आणि हिंदू धर्मियातील तणावाच्या घटनांसाठी संवेदनशील आहेत , मात्र गेल्या काही वर्ष्यात राज्यातील हिंदू - मुस्लिम तणावांपेक्षा दलित - सवर्ण तणावाची व्याप्ती वाढली असल्याचे समोर आले आहे .
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे , सांगली , सातारा , कोल्हापूर , मराठवाड्यातील लातूर , परभणी , बीड , उस्मानाबाद आणि पूर्व विदर्भातील वाशीम यवतमाळ , वर्धा , अमरावती , अकोला तसेच उत्तर महाराष्ट्रातील धुळे या जिल्ह्यात सवर्ण आणि दलितांमध्ये गेल्या पाच वर्षात तणावाच्या अनेक घटना घडल्या आहेत .
२०१८ मध्ये कोरेगाव - भीमा येथील हिंसाचाराने राज्यातील जातीय तणाव अधोरेखित केला .
मात्र पोलिसांच्या आकडेवारीवरून फडणवीस सरकारच्या पाच वर्षाच्या काळात जातीय संवेदनशीलता वाढत गेल्याचे समोर येत आहे .
राज्यातील जातीय तणावाच्या घटना !

२०१६ - अदखलपात्र घटना - ५२१६ , दखलपात्र घटना - २४८४
२०१७ - अदखलपात्र घटना - ५७५५ , दखलपात्र घटना - २४०७
२०१८ - अदखलपात्र घटना - ६४३४ , दखलपात्र घटना - २४८४
२०१९ [ जुलै पर्यंत ] - अदखलपात्र घटना - ३२९३ ,
दखलपात्र घटना - १२६५ .
पूर्व प्रसिद्ध : लोकनायक शनिवार दि , २१ सप्टेंबर
No comments