कल्याणकारी राज्यव्यवस्थेसाठी भारतीय संविधान एक पोलादी पाया : संविधान दिन विशेष

Share:


कल्याणकारी राज्यव्यवस्थेसाठी भारतीय संविधान एक पोलादी पाया :  संविधान दिन विशेष 

Dr Babasaheb Ambedkar Statue at Parliament

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व भारताचे पहिले कायदामंत्री डॉ . बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेवर भाष्य करताना म्हणाले होते कि , राज्यघटना कितीही चांगली असली , तरी वापरणारी माणसे जर चांगली नसतील , तर घटना निश्चितच वाईट ठरेल . म्हणून जनता आणि पक्ष कसे वागतात , यावरच बहुदा तिचे भवितव्य अवलंबून राहील . म्हणजे ६९ वर्षांपूर्वी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेले प्रेरणादायी विचार आजच्या तरुण पिढीला प्रेरणा देणारे आहेत ...

सन २०१५ पासून ; २६ नोव्हेंबर ; हा दिवस भारतीय राज्यघटनेचा अवलंब करण्याच्या स्मरणार्थ .. संविधान दिन .. म्हणून देशभर साजरा केला जातो .  आज २६ नोव्हेंबर , २०१९ संकल्पना दिन किंवा संविधान दिन म्हणून भारत सरकारच्या वतीने देशभर ; संविधानं दिन ; विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे . यात शाळा , महाविद्यालये यांनी मॉक पार्लमेंट्स आयोजित करून संविधानाच्या उधेशिकेचे वाचन , निबंध लेखन स्पर्धा , भाषण आणि वादविवाद स्पर्धा आयोजित करून संविधानं दिवस साजरा करणार ,

 तर आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने २६ नोव्हेंबर , २०१९ ते २६ नोव्हेंबर २०२० या एका वर्षाच्या कालावधीत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक जिल्ह्यात भारतीय संविधानातील नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांच्या जागृकतेसाठी नागरिकांचे मूलभूत कर्तव्य जागरूकता मोहीम राबविण्यात येणार आहे . तसेच आजच्या ६९ व्य संविधानं दिनानिमित्त , .. भारत राज्यगंगा गौरव यात्रा .. चा एक भाग म्हणून ६९ वाहने ५०० किलोमीटर अंतरावर रवाना केली जाणार आहेत .

यापूर्वी १९७९ मध्ये सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन या वकिलांच्या संस्थेने केलेल्या ठरावानंतर हा दिवस ,
राष्ट्रीय कायदा दिन .. म्हणून साजरा केला जात होता .

सन २६ नोव्हेंबर , १९४९ रोजी भारतीय संविधान समितीने भारतीय राज्यघटना स्वीकारली आणि ती २६ जानेवारी १९५० रोजी लागू झाली . भारत सरकारने राजपत्र अधिसूचनेद्वारे १९ नोव्हेंबर , २०१५ रोजी २६ नोव्हेंबरला .. संविधान दिन .. म्हणून घोषित केले ..

त्या आधी  भारतीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ११ ऑक्टोबर २०१५ रोजी येथील इंदू मिल्स कंपाऊंड येथे डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या ; स्टॅचू  ऑफ इक्विलिटी ; स्मारकाचा पायाभरणी करताना संविधान दिनाची घोषणा होती .
सन २०१५ या वर्षी डॉ बाबासाहेब यांची १२५ वि जयंती होती . डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष्यपद भूषविले होते आणि राज्यघटनेच्या मसुद्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली होती .

भारतीय राज्यघटनेचे महत्व , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व कल्पना पसरविण्यासाठी २६ नोव्हेंबरची निवड करण्यात आली .

आपल्या देशात संविधान दिनाची सार्वजनिक सुट्टी नसते .

भारत सरकारच्या विविध विभागांनी पहिला संविधान दिन [ २६ नोव्हेंबर २०१५ रोजी ] साजरा केला . देशात शिक्षण व साक्षरता विभागानुसार संविधानाच्या उधेशिकेचे वाचन सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांनी केले .
 या व्यतिरिक्त , भारतीय राज्य घटनेच्या विषयावर क्विझ आणि निबंध स्पर्धा ऑनलाईन आणि ऑफलाईन अश्या दोन्ही प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या .

प्रत्येक शाळेत घटनेची ठळक वैशिष्ट्ये यावर व्याखाने झाली . देशातील  उच्च शिक्षण विभागाने विविध विद्यापीठांना व विद्यापीठातील संलग्न महाविद्यालयांमध्ये उपहासात्मक संसदीय वादविवाद आयोजित करण्याची विनंती केली आणि विद्यापीठ अनुदान आयोगाने [ यू जी सि
] अखिल भारतीय क्विझ स्पर्धेचे आयोजन डॉ . आंबेडकर विद्यापीठ , लखनौ येथे केले . ज्यात सर्व राज्यांमधील प्रश्नोत्तरी विजेत्यांनी भाग घेतला .

परराष्ट्र मंत्रालयाने सर्व परदेशी भारतीय शाळांना २६ नोव्हेंबर हा दिवस ; संविधान दिन ; म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आणि दूतावासांना त्या देशाच्या स्थानिक भाषेत घटनेचे भाषांतर करण्याचा आणि ते विविध अकादमी , ग्रंथालये आणि भारतीय विज्ञान शाखांमध्ये वितरित करण्याचे निर्देश दिले ,

तसेच भारतीय घटनेचे अरबी भाष्यांतर करण्याचे काम पूर्ण झाले आहे .

क्रीडा विभागाने ; रन फॉर इक्विलिटी ; नावाच्या प्रतीकात्मक  धावण्याची व्यवस्था केली .

संविधान आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी २६ नोव्हेंबर , २०१५ रोजी  भारतीय संसदेचे विशेष अधिवेशनही झाले होते .

इतकी ताकद भारतीय संविधानामध्ये आहे . हा खऱ्या अर्थाने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव म्हणावा लागेल ..

संविधान दिनाबद्दल भारतीय राज्यघटनेचे वर्णन - ग्रॅनव्हिले
ऑस्टिन ने : प्रथम सामाजिक क्रांती साठी केले .

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय राज्यघटनेत कायमस्वरूपी योगदान भारतातील सर्व नागरिकांना मदत करते .
न्याय , समानता , स्वातंत्र्य आणि संघटनांद्वारे भारतीयांना सुरक्षित करण्यासाठी स्वतंत्र , साम्यवादी , धर्मनिरपेक्ष , स्वायत्त आणि प्रजासत्ताक म्हणून देशाची स्थापना करण्यासाठी भारतीय राज्यघटनेचा अवलंब केला गेला .


जेव्हा भारतीय राज्यघटना स्वीकारली गेली , तेव्हा भारतीय नागरिक शांतता , शिष्टता आणि प्रगतीसह नवीन घटनात्मक , वैज्ञानिक , स्वराज्य व आधुनिक भारतात दाखल झाले .


भारतीय राज्यघटना हि जगातील सर्वात मोठी राज्यघटना असून , संविधान लिहण्यासाठी सुमारे २ वर्ष ११ महिने आणि १७ दिवस लागले होते .

आता आपण भारतीय राज्यघटनेच्या काही वैशिष्ठ्यांचा विचार करूया । 


भारतीय राज्यघटना हि लिखित आणि विस्तुत स्वरूपाची आहे .

 यात लोकशाही शासन पद्धती आहे .

लोकशाही प्रणाली मध्ये निवडून आलेले लोकप्रतिनिधी असतात . 

मूलभूत अधिकार , न्यायव्यवस्था , प्रवास , भेट , भाषण , धर्म , शिक्षण यांचे स्वातंत्र्य असते . 

यामुळे राष्ट्रीयत्व टिकून राहते .

भारतीय राज्यघटना लवचिक आहे .
 
राष्ट्रीय स्थरावर जाती व्यवस्थेचे विमोचन , सामान्य नागरिक कोड आणि अधिकृत भाषा आहे .

केंद्र बौद्ध ; गणराज्य ; प्रमाणे आहे .

बुद्ध आणि बौद्ध विधीचा प्रभाव आहे .

भारतीय राज्यघटना अमलात आल्यापासून महिलांना मतदानाचा हक्क मिळाला .

जगभरातील विविध देशांनी भारतीय राज्यघटनेचे अनुसरण केले आहे .
 
म्हणूनच कल्याणकारी राज्यव्यवस्थेसाठी भारतीय संविधान एक पोलादी पाया आहे , असे अभिमानें म्हणावे लागेल . 
याचे एकमेव कारण म्हणजे , 
भारताच्या घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर होय .


लेख : रवींद्र तांबे ,
संकलन : सचिन डावरे ..

No comments