बुद्धीवादी होण्यासाठी युवा पिढीने बुद्धधम्माचा अभ्यास करावा - दलाई लमा

Share:

बुद्धीवादी होण्यासाठी युवा पिढीने बुद्धधम्माचा अभ्यास करावा - दलाई लमा .


औरंगाबाद , दि . २४ - महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी  १९५६ साली लाखो लोकांना बुद्धधम्माची दीक्षा दिली , हे अतिशय मोलाचे कार्य आहे . आजच्या युवा पिढीने बुद्धीवादी होण्यासाठी बुद्धधम्माचा अभ्यास करावा , असे आवाहन जागतिक कीर्तीचे धम्मगुरु दलाई लामा यांनी केले . नागसेनवनातील मिलिंद महाविद्यालयाच्या स्टेडियमवर जागतिक धम्मपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते . त्या वेळी दलाई लामा बोलत होते . यावेळी विचारमंचावर श्रीलंकाचे भन्ते डॉ .  वर्कगोडा , भन्ते सदानंद [ महास्थवीर ] , भिक्खू ट्रैनिंग सेंटरचे भन्ते बोधिपालो , आयोजक डॉ . अरविंद गायकवाड , रक्षित कांबळे , मोहिनी कांबळे , आदी मान्यवर व भिक्खुसंघ उपस्थित होते .

दलाई लामा यांचे वय लक्ष्यात घेता आयोजकांनी त्यांना फुलांच्या गाडीतून थेट मंचापर्यंत सन्मानाने आणले . या वेळी भन्ते बोधिपालो , भन्ते सदानंद [ महास्थवीर ] , औरंगाबाद मनपाचे लेखापाल संजय पवार यांनी पुष्पगुच्छ व शाल अर्पण करून त्यांचे स्वागत केले . श्रीलंकेचे भन्ते वर्कगोडा [ महास्थवीर ] यांनी सामूहिक त्रिशरण पंचशील दिले . या वेळी धम्माई डिक्श वेबसाइट चे उदघाटन भिक्खू संघाच्या व मोहिनी कांबळे , रक्षित कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले .

दलाई लामा पुढे म्हणाले कि , 

तथागत बुद्धांनी आपले आयुष्य ज्ञान प्राप्तीसाठी खर्ची  घातले .

 बुद्ध धम्माचा भारतात जन्म झाला .

 बुद्धधम्म हा मानवतावादी , विज्ञानवादी आहे , या धम्मात अंधश्रद्धा नाही .

 विश्वाला अहिंसेची गरज आहे .
 भारत देश हा जगात एकमेव असा देश आहे कि जिथे सर्व जातीचे लोक शांततेने , गुण्या गोविंदाने नांदत आहेत .

 शिक्षणाने माणूस आयुष्यात यशस्वी होऊ शकतो .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भन्ते बोधिपालो यांनी केले तर आभार डॉ . हर्षदीप कांबळे यांनी मानले .  या कार्यक्रमासाठी परदेशातील पत्रकार व अनेक मान्यवर भिक्खू , उपासक उपासिका उपस्थित होत्या . मिलिंद कॉलेजचे प्रांगण भरून गेले होते . संपूर्ण शहर सजले होते , या वेळी मैदानावर पुस्तेके , मुर्त्या , पताके , झेंडे , बॅच आदी आंबेडकरी साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले होते . 

पंधराशे धम्मसेवकांनी सेवा दिली .

परदेशातील भिखूनची सेवा बुद्धविहार समितीने केली होती . लोकुत्तर बुद्धविहार , चौकां , औरंगाबाद येथे दलाई लामा यांनी भिखू ट्रैनिंग सेंटरच्या भिक्खूंना मार्गदर्शन केले .
पहिल्या दिवशी नागसेनवनातील कार्यक्रमाचे उदघाटन भन्ते वर्कगोडा [ श्रीलंका ] यांनी केले . आज दलाई लामांच्या धम्म देसनेने तीन दिवसीय जागतिक धम्मपरिषदेची सांगता झाली . सायंकाळच्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रम व भिक्खू संघाची धम्मदेसना  झाली .

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ .अरविंद गायकवाड , डॉ भारत सोनावणे , भीमराव मुग्दल , संजय डोंगरे  ,कैलास कांबळे , शरद डोंगरे , कृष्ण भंडारे , जे . एल मस्के , शांतीलाल गायकवाड , दैवशाला गवंन्दे , विनिता सातदिवे , संगीत गंगावणे , कमलाताई मनोरे , डॉ .अर्चना गणवीर , प्राचार्य किशोर साळवे , प्रा . वाल्मिक सरवदे , यशवंत भंडारे , आर के गायकवाड , प्रवीण मोरे , नामदेव वानखेडे , आदेश आटोटे , भारत शिंदे , फुलचंद गायकवाड , राजेंद्र पवार , राजेंद्र काळे , उर्मिला ओहाळकर , राहुल जाधव , जी एस पाईकराव , संभाजी कांबळे आदींनी परिश्रम घेतले .


His Holiness the Dalai Lama waving to the crowd as he prepares to leave the stage at the end of his talk at PES College of Physical Education in Aurangabad, Maharashtra, India on November 24, 2019. Photo by Tenzin Choejor

सोर्स : दै सम्राट , २५/११/२०१९
संकलन - आयु : सचिन डावरे ,

No comments