राज्यपालांकडून लोकांना विश्वासात न घेता कारभार झाला - प्रकाश आंबेडकर.

Share:


राज्यपालांकडून लोकांना विश्वासात न  घेता कारभार झाला - प्रकाश आंबेडकर.


अकोला , दि २३ - राज्यात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत सत्ता स्थापन करण्याचा दावा करीत घाई घाईत शपथविधी उरकणे हे अचानक घडलेले नाही . राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष  अमित शाह यांची भेट घेतली , तेव्हाच हे सर्व शिजले होते ..
आपण तसा इशाराहि दिला होता , अशी प्रतिक्रिया  वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड । प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी व्यक्त केली .

राज्यात सत्ता स्थापनेचा  तिढा सुटत असताना आणि महाविकास आघाडीचा सत्तास्थापनेचा फॉर्मुला निश्चित झाला असतानाच , शनिवारी सकाळीच भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी एकत्र येत सत्तास्थापनेचा दावा केला . 
एवढेच नव्हे , तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधीही उरकण्यात आला . या घडामोडीवर प्रतिक्रिया देताना आंबेडकर म्हणाले , कि हि घडामोड अचानक झालेली नाही . काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दिल्लीत प्रधानमंत्री मोदी आणि अमित शाह यांची भेट घेतली . तेव्हाच असे काहीतरी होणार याचा आपल्याला अंदाज आला होता .

सत्तास्थापनेत शिवसेनेचा पोपट होऊ शकतो ,

सत्तास्थापनेत शिवसेनेचा पोपट होऊ शकतो , असा इशारा हि आपण दिला होता . परंतु , राजकारणातील चातुर्य कमी पडल्याने त्यांची फसवणूक झाली , असे आंबेडकर म्हणाले .

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी सकाळीच उरकण्यात आला .
राज्यपालांनी घाई घाईत हा शपथविधी केला . हे काम घटनेला धरून नाही .. 
लोकांना विश्वासात घेऊन शपथविधीचा पूर्वकल्पना द्यायला हवी होती .

राज्यपालांकडून लोकांना विश्वासात न घेता कारभार झाला , असेही आंबेडकर या वेळी म्हणाले .


पूर्व प्रकाशित - दै सम्राट २४/११/२०१९ 
संकलन : सचिन डावरे ,

No comments