अयोध्येचे निकालपत्र नेमके लिहले कोणी ?
न्यायमूर्तीनी पहिल्यांदाच नाव व सहीचा उल्लेख टाळला ; रहस्य कायम ; लिखाणावर डी . वाय . चंद्रचूड यांची छाप !
नवी दिल्ली , दि १० [ वृत्तसंस्था ] - हिंदू - मुस्लिमांच्या भावनांचा आदर करीत अयोध्या खटल्याचा ऐतिहासिक निकाल देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाने ७० वर्षे जुन्या परंपरेबाहेरील काही गोष्टी केल्या .१०२४ पानी निकालपत्रात पहिल्यांदाच निकाल लिहणाऱ्या न्यायमूर्तींचे नाव व सहीचा उल्लेख टाळला आहे . त्यामुळे पाच न्यायमूर्तींपैकी नेमका कोणी निकाल लिहला , याचे रहस्य कायम आहे . जाणकारांच्या मते , निकाल लिहण्याचा शैलीवर न्यायमूर्ती डी . वाय . चंद्रचूड यांची छाप आहे .
सरन्यायाधीश रंजन गोगई यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठाने शनिवारी अयोध्येचा ऐतिहासिक निकाल दिला . न्यायालयाच्या परंपरेनुसार निकालपत्राच्या शेवटी घटनापीठाच्या वतीने निकाल लिहणाऱ्या न्यायमूर्तींचे नाव व सही असते आणि तेच न्यायमूर्ती कोर्टरूममध्ये निकालपत्र वाचतात .
अयोध्येचा निकाल देताना मात्र घटनापीठाने निकालपत्र लिहणाऱ्या न्यायमूर्तींची ओळख गोपनीय ठेवली आहे . सरन्यायाधीश गोगोई यांनी या खटल्याच्या निकालपत्राचे वाचन केले .
हा निकाल देताना पहिल्यांदाच ११६ पानी परिशिष्ट जोडण्यात आले .
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची निकाल लिहण्याची खास शैली असते . तसेच ते विशेष प्रकारचा फॉन्ट वापरतात . जाणकारांच्या मते , विशिष्ट शैली व फॉण्टचा वापर पाहिल्यास या निकालपत्रावर न्यायमूर्ती चंद्रचूड यांची छाप आहे .
पाच सदसिय घटनापीठाने एकमताने निकाल दिला असला तरी एका न्यायमूर्तीनी परिशिष्टमध्ये स्वतंत्र मते नोंदविली आहेत .
श्रीरामजन्मभूमीवर हिंदूंनी नेहमीच पूजा केली असल्याचे सिद्ध करण्यासाठी प्राचीन हिंदू शास्त्रवचनांचा संधर्भ देण्यात आला . बाबरी मशीद उभारली गेली , ती प्रभू श्रीरामाच्या जन्माची जागा असल्याचे सिद्ध करण्यासाठी साक्षीदारांनी बुहद - धर्मोत्तरा पुराण आणि स्कंद पुराण यांचे दाखले दिले .
गुरुनानक देव यांनी १५१० -११ च्या सुमारास श्रीरामजन्मभूमीला भेट दिल्याचा पुरावा शीख शास्त्र वचनात असल्याचे साक्षीदाराच्या जबानीत म्हटले आहे .
निकाल लिहण्यासाठी वापरलेला फॉन्ट विचारात घेत विशेष परिशिष्ट
न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी लिहिल्याचा अंदाज जाणकारांनी वर्तवला आहे .
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालासोबत परिशिष्ट जोडण्याची नवीन परंपराही अयोध्या निकालाच्या निमित्ताने सुरु झाली आहे .
सरन्यायाधीश रंजन गोगई यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठाने शनिवारी अयोध्येचा ऐतिहासिक निकाल दिला . न्यायालयाच्या परंपरेनुसार निकालपत्राच्या शेवटी घटनापीठाच्या वतीने निकाल लिहणाऱ्या न्यायमूर्तींचे नाव व सही असते आणि तेच न्यायमूर्ती कोर्टरूममध्ये निकालपत्र वाचतात .
अयोध्येचा निकाल देताना मात्र घटनापीठाने निकालपत्र लिहणाऱ्या न्यायमूर्तींची ओळख गोपनीय ठेवली आहे . सरन्यायाधीश गोगोई यांनी या खटल्याच्या निकालपत्राचे वाचन केले .
हा निकाल देताना पहिल्यांदाच ११६ पानी परिशिष्ट जोडण्यात आले .
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची निकाल लिहण्याची खास शैली असते . तसेच ते विशेष प्रकारचा फॉन्ट वापरतात . जाणकारांच्या मते , विशिष्ट शैली व फॉण्टचा वापर पाहिल्यास या निकालपत्रावर न्यायमूर्ती चंद्रचूड यांची छाप आहे .
परिशिष्ट मध्ये काय आहे ?
पाच सदसिय घटनापीठाने एकमताने निकाल दिला असला तरी एका न्यायमूर्तीनी परिशिष्टमध्ये स्वतंत्र मते नोंदविली आहेत .
श्रीरामजन्मभूमीवर हिंदूंनी नेहमीच पूजा केली असल्याचे सिद्ध करण्यासाठी प्राचीन हिंदू शास्त्रवचनांचा संधर्भ देण्यात आला . बाबरी मशीद उभारली गेली , ती प्रभू श्रीरामाच्या जन्माची जागा असल्याचे सिद्ध करण्यासाठी साक्षीदारांनी बुहद - धर्मोत्तरा पुराण आणि स्कंद पुराण यांचे दाखले दिले .
गुरुनानक देव यांनी १५१० -११ च्या सुमारास श्रीरामजन्मभूमीला भेट दिल्याचा पुरावा शीख शास्त्र वचनात असल्याचे साक्षीदाराच्या जबानीत म्हटले आहे .
विशेष परिशिष्ठाचे लेखक न्यायमूर्ती अशोक भूषण ,
निकाल लिहण्यासाठी वापरलेला फॉन्ट विचारात घेत विशेष परिशिष्टन्यायमूर्ती अशोक भूषण यांनी लिहिल्याचा अंदाज जाणकारांनी वर्तवला आहे .
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालासोबत परिशिष्ट जोडण्याची नवीन परंपराही अयोध्या निकालाच्या निमित्ताने सुरु झाली आहे .
निकालपत्रात १७ चॅप्टर व श्रेणीनिहाय विभागणी .
अयोध्येच्या निकालपत्रात एकूण १७ चॅप्टर असून ए ते क्यू पर्यंतच्या श्रेणीमध्ये विभागणी केली आहे . न्यायमूर्ती चंद्रचूड वगळता सर्वोच्च न्यायालयातील सध्याच्या न्यायमूर्तींपैकी कोणीही निकालपत्र वेगवेगळ्या चॅप्टर वा खंडांमध्ये विभागणी करीत नाही .
न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी आधार , शबरीमाला , राईट तू प्रायव्हसी यांसारख्या खटल्यांच्या निकालासाठी काही चाप्टरचा प्रयोग केला होता .
No comments