डॉ .आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क माफी !

Share:


 डॉ .आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची
 विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क माफी !

औरंगाबाद , ११ नोव्हे [ प्रतिनिधी ] :
     डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ४२ विभाग आणि उस्मानाबादेतील १० विभागात शिक्षण घेत असलेल्या दुष्काळ आणि अतिवृष्टीग्रस्त भागातील ५०८९ विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे .
याविषयीचा ठराव कुलगुरू डॉ  प्रमोद येवले यांनी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मांडला । त्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने कळविली आहे । असा निर्णय घेणारे हे राज्यातील पहिलेच विद्यापीठ ठरले आहे .
विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या जिल्ह्यात आधी दुष्काळ आणि आता अतिवृष्टी झाली आहे . त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे . त्या विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या अतिवृत्तिग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी त्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा ठराव व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मांडण्याचा निर्णय घेतला होता . त्यानुसार कुलगुरू डॉ .  येवले यांनी शैक्षणिक शुल्क माफीचा ठराव मांडला . विद्यापीठाच्या मुख्य परिसरातील ४२ विभाग व उस्मानाबाद उपपरिसरातील १० विभागातील ५०८९ विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे , सर्वच सदस्यांनी या ठरावाला अनुमोदन देत तो बहुमताने मंजूर केला .


No comments