दिवाळी नंतरचे राजकीय फटाके !

Share:


दिवाळी नंतरचे राजकीय फटाके !



दीपावली संपली आहे . दिपोत्सवातल्या आनंदातून मिळालेल्या आत्मविश्वासाची शिदोरी आता वर्षभर पुरेल . सामाजिक , सांस्कृतिक एवढेच नाही , आर्थिक क्षेत्रामध्येही परिणाम  करणारा उत्सव प्रेरणा देणारा असतो . आता पूर्ववत आपापली कामे सुरु होतील . सध्या गाजत असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल काय काय करामती करतो , हे पाहणे देखील उत्सुकतेचे ठरेल .
गेल्या दोन दिवसातल्या घडामोडीवरून  राज्यात युतीचीच सत्ता असावी असे पाहायला मिळते . भारतीय जनता पार्टीला सर्वाधिक जागा मिळाल्या असता , आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री झाला पाहिजे हि आपली त्यांची स्वाभाविक इच्या ठरते . परंतु युती टिकविताना काही तडजोडी कराव्या लागतात . त्याची आठवण सेनेने करून दिली  आहे . दोन्ही काँग्रेसची आघाडी प्रबळ विरोधी पक्ष म्हणून काम करू शकेल . परंतु तेथेसुद्धा विरोधीनेते पदासाठी सुद्धा रस्सीखेच होण्याची शक्यता आहे .
दिवाळीनंतरचे हे राजकीय फटाके , कोण किती  जोरात फोडतो ? 
याच्यावर बरेचकाही अवलंबून असते . २२० जागा जिंकण्याचा दावा करणाऱ्या भाजपाला जेमतेम १६० जागांवर समाधान मानावे  लागले आहे . त्यातही भाजपच्या १०५ जागा निवडून आल्या . थोडक्यात सांगायचे तर सत्ता टिकविण्याकरिता भाजपाला बऱ्याच तडजोडी कराव्या लागतील . ज्या १५ बंडखोरांनी भाजपाला पाठिंबा देऊकेल्याचे सांगितले जाते , त्यांची  सुद्धा सोय करावी लागेल .
महत्वाचे म्हणजे भाजपा आणि सेने यांच्यातील पदांच्या वाटणीवरून सुद्धा संघर्ष होण्याची शक्यता आहे . 
कोणत्याही एका पक्षाला मतदारांनी कौल दिलेला नाही . परिणामी विजय झालेला प्रत्येक पक्ष आपला सत्तेतला योग्य वाटा पटकाविण्याकरिता कोणत्याही ठरला जाऊ शकतो . या सगळ्या प्रकारात सामान्य जनतेला एक राजकीय प्रदर्शन पाहण्याची संधी मिळेल .
कोणालाच पुरेसे बहुमत नाही , याच गोष्टीचा आपल्याला कसा फायदा करून घेता येईल अशी खेळी सेना भाजप आणि अन्य घटक पक्ष किंवा अपक्ष करीत राहतील . त्यांच्या या राजकीय साठमारीचा खेळ पुढचे काही दिवस चालू राहतील .
कोण मंत्री होईल , कोणाला कोणते खाते मिळते आहे या वरून देखील बरेच फटाके फुटू शकतात ।
महायुतीला सर्वाधिक जागा मिळूनही स्थिर सरकार राज्याला मिळालेले नाही हि ,
हि वस्तुस्थिती आहे ...

मतदारांचा स्पष्ट निर्धार ,

दिवाळीनंतरची हि राजकीय आतिषबाजी निर्भेळ स्वरूपाची नाही , हे मान्य करायला हवे .
कारण मतदारांर्नी या वेळी मोठ्या चाणाक्षपणे मतदान केले आहे . प्रत्येक पक्षाला आपापली जागा दाखवून दिली आहे . अति आत्मविश्वास दाखविणाऱ्यांना बहुमतापासून रोखले आहे . ते अनेक वर्षे सत्ता उपभोगल्यावरही निरपेक्षपणे जनतेची सेवा करण्याची तयारी नसलेल्या दोन्ही काँग्रेसला देखील आपल्या मर्यादेत राहण्याचा सल्ला मतदारांर्नी दिला आहे .
या निवडणुकीच्या निकालाचा निष्कर्ष सांगायचा झाला तर प्रत्येक पक्षाला आपापली सीमारेषा दाखविण्याचें काम मतदारांनी केले .
राजकारण हे सत्ताकारणासाठी जरी होत असले तरी सामान्य मतदाराला गृहीत धरून चालणार नाही , असा इशारा मतदारांनी दिला आहे . खरेतर ज्यावेळेपासून सत्ताधारी भाजपामध्ये मेगा भरती सुरु झाली तेव्हाच मतदारांनी हे निश्चित केले कि , जो योग्य उमेदवार असेल त्यालाच मते द्यायचे .
पक्षापेक्षा  व्यक्ती किंवा माणूस कसा आहे , हे पाहून मतदान करण्याचे धोरण मतदारांनी अंगिकारले होते .
ज्याला नाराजीची छुपी लाट म्हणता येईल  ती निवडणुकी पूर्वीच निर्माण झालेली होती ,  ती ओळखण्याचे शहाणपण सत्ताधाऱ्यांकडे उरले नव्हते आणि आता एकतर्फी यश आपल्यालाच मिळेल अशा समजुतीत सत्ताधारी पक्ष बेभान झालेला होता . निकालानंतर त्याचे प्रत्यक्ष परिणाम दिसून आलेले आहेत . सत्ता राबविताना विकासाची कामे जर खरोखर झाली असती तर मतदारांनी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता सत्ताधारी पक्षाच्या बाजूने मतदान केले असते , परंतु या विकासकामांची सत्ताधारी पक्षालाच खात्री वाटली नाही .

म्हणून थेट मुख्यमंत्र्यांनाच महाजानदेश यात्रा काढावी लागलीं . ऐन निवडणुकीच्या तोंडावर आपण केलेली कामे लोकांना सांगायची वेळ जर मुख्यमंत्र्यांवर येत असेल , तर मुख्यमंत्र्यांचाच आत्मविश्वास डळमळीत असल्याचे निदर्शक ठरते .

अश्या परिस्थितीत मतदारांनी स्वतः चा संभ्रम न करून घेता जो कामाचा तोच मतदानाचा असे समीकरण आखून घेतले .

म्हणूनच अनेक अपक्ष किंवा १५ बंडखोर निवडून आले .

एवढेच नाही तर काँग्रेस मधून भाजपा - सेनेत आलेल्या ३५ पैकी १९ जणांना मतदारांनी पराभूत केलेले आहे . 

या पराभवाचे आत्मपरीक्षण , चिंतन , मनन असे काही करण्याची आवश्यकता नाही . फक्त प्रत्येक राजकीय पक्षाने आपल्या बोलण्यावागण्यात किंवा व्यवहारात सुधारणा केली तरी पुष्कळ झाले .

आज मतदारांना तीच अपेक्षा आहे .

विकासकामांचे नुसते ढोल न वाजविता प्रत्यक्ष  सामान्य माणसाला दिलासा मिळेल , अशी कामे त्यांनी केली पाहिजे .

No comments