शिवसेना , भाजपला मतदान करणाऱ्या मुंबईकरांनी आरे बद्दल ना बोलणेच बरे !

Share:

शिवसेना , भाजपला मतदान करणाऱ्या मुंबईकरांनी  ..

 आरे बद्दल ना बोलणेच बरे ! - काँग्रेस 

 आरे .. तील वृक्षतोड तात्काळ थांबवा ; सुप्रीमकोर्टाचा आदेश !


मुंबई , दि 5 - शिवसेना आणि भाजपला मत देण्याच्या तयारीत असणाऱ्या मुंबईकरांनी  आरे , बद्दल मगरीचे अश्रू ढाळणेबंद करावे ! असा टोला काँग्रेस ने , लगावला आहे . काँग्रेस चे प्रवक्ते sanjay झा यांनी twiter वरून .. आरे , येथील ४०० हुन  अधिक झाडे कापण्यात आल्याच्या कारवाईला विरोध दर्शविला आहे . 
उच्च न्यायालयाने , शुक्रवारी संध्याकाळी आरे येथील मुंबई मेट्रो तीनच्या जागेसाठी वृक्षतोड करण्यासाठी परवानगी दिली . त्या नंतर एका रात्रीत प्रशासनाने काही शेकडा झाडे कापली .आरेमध्ये  वृक्षतोड सुरु असल्याचे वृत्त समजताच अनेक पर्यावरण प्रेमींनी आरे कारशेडच्या ठिकाणी धाव घेतली , ट्विटरवरही या घटनेचे पडसाद दिसून आले . काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते असणाऱ्या झा यांनी वृक्षतोड करण्याच्या निर्णयाला राज्यातील युतीसरकार जवाबदार असल्याचे अप्रत्यक्षरीत्या म्हटले आहे .तसेच विधानसभा निवडणुकीच्या पाश्ववभूमीवर त्यांनी शिवसेना , भाजपाला मत देण्याच्या तयारीत असलेल्याना आरेसाठी आंदोलन करण्याचा अधिकार नसल्याचे आपल्या ट्विटमधून म्हटले आहे . 

; ज्या , मुंबईकरांनी शिवसेना आणि भाजपाला मत देण्याचा निर्णय घेतला आहे त्यांनी आरेसाठी .. मगरीचे अश्रू ढाळणे बंद करावे अशी नम्र विनंती आहे .

आरेतील वृक्षतोडीला विरोध करणारे ट्विटकरने तसेच आंदोलन करत असल्याचे नाटके करणे बंद करा . जे बोलता ते करून दाखवा ; 

असा टोला झा , यांनी twiter वरून लगावला आहे .


                                                          दरम्यान ,

..आरेतील , वृक्षतोड तात्काळ थांबवा ! शुप्रेम कोर्टाचा आदेश ।

a


नवी दिल्ली , दि ७ - मेट्रो कारशेडसाठी करण्यात येणाऱ्या आरेतील वृक्षतोडीच्या मुद्यावर र्सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला .पुढील सुनवाई होईपर्यंत न्यायालयाने वृक्षतोड करण्यास स्थगिती दिली आहे .
 ग्रेटर नोएडातील विद्यार्थ्याने लिहलेल्या पत्राची दाखल घेत सर्वोच्च न्यायालयाने स्यू मोटू याचिका दाखल करून घेतली होती , त्यावरून सुनावणी करताना न्यायालयाने वृक्षतोडीला स्थगिती देण्याबरोबरच अटक केलेल्या आंदोलकांना तत्काळ सोडण्याचे आदेश दिले आहेत ,
या प्रकरणी पुढील सुनावणी २१ ऑक्टोबर रोजी होणार आहे . मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी वृक्षतोड करण्यास , मनाई नसल्याचा निर्णय उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिल्यानंतर , त्याच रात्रीपासून आरेमध्ये वृक्षतोड करण्यात आली . 
मात्र सरकारकडून करण्यात  येणाऱ्या पर्यावरणवाद्यांसह विद्यार्थ्यांकडून  कडाडून विरोध होत आहे , 

मुंबई उच्च न्यायालयाने वृक्षतोडीला परवानगी दिल्यानंतर ग्रेटर नोएडा येथील विधी शाखेचा विद्यार्थी रिशीव रंजन याने सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना आरेतील वृक्षतोडीबाबत पात्र पाठिवले होते . 

त्याची प्रत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही पाठविण्यात आली आहे .


बृहन्मुंबई महापालिकेसह मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाने सुरु केलेल्या आरेमधील वृक्षतोडीला स्थगिती देण्याची विनंती त्याने या पात्रद्वारे केली होती .

या पाच पानी पत्राची सर्वोच्च न्यायालयाने स्वतः हुन दखल घेतली असून ,

या पत्राचे जनहित याचिकेत रूपांतर करण्यात आले होते ..

या याचिकेची न्या । अशोक भूषण यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली । यावेळी न्यायालयाने आरेतील वृक्षतोडीवर नाराजी व्यक्त केली .

आरेतील झाडे तोडायला नको होती , असे सांगतानाच आरेतील वृक्षतोड तत्काळ तत्काळ थांबवा , असे आदेश न्यायालयाने दिले , त्यावर आत्तापासून एकाही  वृक्षाची तोड केली जाणार नाही , अशी माहिती राज्याची बाजू मांडणारे महाधिवक्ता तुषार मेहता यांनी न्यायालयात दिली , पुढील सुनावणी होईपर्यंत परिस्थिती जैसे ठेवण्याचे आदेश देत न्यायालयाने वृक्षतोडीला स्थगिती दिली आहे .





source : सम्राट 




No comments