भिडेंवर लवकर आरोपपत्र दाखल करा ,
हायकोर्टाचे राज्यसरकारला आदेश !
भिमाकोरेगाव हल्ला
मुंबई , दि : ३ -
भीमाकोरेगाव हल्ल्या प्रकरणी मनोहर उर्फ संभाजी भिडे व इतर आरोपींच्या विरोधात लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करा , असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत . भीमा कोरेगाव हल्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात अली आहे , या याचिकेच्या सुनावणी दरम्यान उच्च न्यालयाचे न्यायमूर्ती रणजित मोरे , यांच्या खंडपीठाने ११ नोव्हेम्बर पर्यंत या प्रकरणातील आरोपींच्या विरोधात आरोपपत्र दाखल करावे ,
असे आदेश दिले आहेत .
१ जानेवारी २०१८ ला भीमा कोरेगाव येथे भीम सैनिकांवर हल्ला झाल्यानंतर या प्रकरणातील तक्रारदार , अनिता साळवे यांच्या तक्रारी
नंतर मिलिंद एकबोटे व मनोहर भिडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता । यामध्ये मिलिंद एकबोटे व मनोहर भिडे यांच्या सह इतरांनाही आरोपी करण्यात आले होते .
या संदर्भात मिलिंद एकबोटे यांना अटक झाली होती . पण , मनोहर भिडे यांच्यावर कुठलीही कारवाही ना झाल्यामुळे त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाही करण्यात यावी , अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेली होती .
मुंबई उच्च न्यायालयाकडून पुणे ग्रामीण पोलीस व राज्य शासनाकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले .
पुणे ग्रामीण पोलिसानी या संदर्भात अद्याप तपास सुरु असून अधिक वेळ मागून घेतला होता . मात्र , या वर उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करीत
११ नोव्हेम्बर पर्यंत सर्व आरोपींवर आरोप पात्र दाखल करावे ,
असे आदेश दिले आहेत ..
पूर्व प्रसिद्ध : वृत्तरत्न सम्राट १८ सप्टेंबर 2019

Subscription & Newsletter
Subscribe for New Post Notifications
No comments