महिलांनो , धम्म तुमची अनिवार्य जवाबदारी !

Share:

महिलांनो , धम्म तुमची
अनिवार्य जवाबदारी 

प्रा । डॉ मीनाक्षी डांगे ..
बहुजन स्त्रिया या कर्मकांडातून जाग्या व्हायच्या तेव्हा होतील , परंतु माझ्या बौद्ध धम्मातील अनेक स्त्रिया हि कर्म कांड अंधपणे करताना दिसतात . कदाचित डोक्यात मेंदू असतो हा शरीराच्या अवयवाचा अविभाज्य भाग आहे . म्हणून त्याची दाखल घ्यावी लागते , अन्यथा मेंदूत बुद्धी असती तर त्यांच्याकडून कोणतीही अंध श्रद्धा कृती होऊही ,
शकली नसती ..

तथागत बुद्धानी , डॉ । बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त शाब्दिक तर म्हटले आहे , स्त्री शक्तीवर माझा प्रचंड विश्वास आहे .
आज डॉ . बाबासाहेब आंबेडकर थोडीच आहेत , माझा विश्वासघात पाहायला . दुसरं म्हणजे तथागत बुद्ध तरं आमच्या या विश्वासघाताला

कोणतीही शिक्षा देऊ शकत नाहीत ,कारण  ते कोणताही चमत्कार करत नाहीत . हीच ती कारणे आहेत , या विश्वासघातास कारणीभूत ठरत आहेत । शिवाय आम्ही काय करायचे हे सांगणारे तुम्ही कोण ? हे अज्ञान शरीराला गळू सारखे चिकटून बसले आहे , ते वेगळेच ..

सध्या हिंदू धर्मातील  नवरात्रौउत्सव हा उत्सव सुरु आहे । कपोलकल्पित
कथांचा आधार घेऊन केवळ रंजकता वाढविणाऱ्या अनेक सण - उत्सवांपैकी हा एक सणोत्सव .
हिंदू संस्कृती मोठी विचित्र वाटते , ज्या स्त्रीवर हजारो वर्षे अन्याय - अत्याचार केले , जिला पशु पेक्ष्या हीन मानले तिलाच काल्पनिक रूपात
मात्र महत्वाचे ठरविले .

या उत्सवात पुजल्या जाणाऱ्या दुर्गा , चंडिका , काली , भैरवी या देवींचे किंचितही भय ना जुमानता हिंदूंच्या कित्येक घरात , आज हि स्त्रीरूपी 
देवीला दररोज लाथा - बुक्यांचा अन्यायरुपी प्रसाद चढविला जातो हे विशेष ! 

नवरात्रोत्सव तसा नऊ दिवसांचा । स्त्रीरूपात असणाऱ्या वेगवेगळ्या दगडी प्रतिमांना देवीची उपमा देऊन तिच्या शौर्याचे पूजन या उत्सवात
होते . याला पुराणकथांचा संदर्भ जोडला , तरी पुराणकथेतील एकही भाकड कथा सिद्ध करण्यासाठी हिंदू संस्कृतीतील लाखो लोकांपैकी कोणीही आजपर्यंत ठाम पने पुढे आले नाही ,
केवळ पुराणात असे सांगितले आहे , वेदांमध्ये असे सांगितले आहे
या एकमेव ओळीचा वापर , बुडत्याला काडीचा आधार म्हणून वापरात आलेला आहे .
कुठल्याही खुळचट कल्पनांना विज्ञानाचा , सत्याचा आधार कितपत आहे

हे पाहणे माणूस म्हणून जन्माला आलेल्या आणि मेंदूत बुद्धी म्हणून कार्य करणाऱ्या प्रत्येक डोक्याचे काम आहे .

केवळ भारतातीलच नव्हे , तर जगातील सर्व पैसा एखाद्या मांत्रिकाला ,
ज्योतिषाला , जादूगाराला अथवा पुजाऱ्याला दिला तरी देव अथवा देवी
नावाच्या कल्पनेचे अस्तित्व तो सिद्ध करू शकणार नाही .
        भारतातील वैद - पुराणे अंधपणे भक्कम करण्याचे काम बहुजन
समाज मोठ्या प्रमाणात करीत आला आहे .
स्वतःला उच्चवर्णीयांच्या खालोखाल तरी स्थान मिळावे यासाठीची ती धडपड .
 केवळ यासाठी युगानुयुगे तो स्वतः ची फसवणूक करीत हिंदूंचे
[ फक्त ब्राह्मण ] सणोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करताना दिसतो .

हे तेच हिंदू आहेत , जे आजही घरातील स्वयंपाक सोवळ्यात झाला नाही 
म्हणून शूद्र स्वयंपाकीण बाईवर गुन्हा दाखल करतात .

हे बहुजन सोयीस्कररीत्या विसरतो , स्त्रिया या वर आघाडीवर आहे .


बहुजन स्त्रिया या कर्मकांडातून जाग्या व्हायच्या तेव्हा होतील . परंतु ,
माझ्या बौद्ध धम्मातील अनेक स्त्रिया हि डोक्यातील मेंदू खुंटीला
लावून हि कर्मकांड अंधपणे करताना दिसतात ,
डोक्यात मेंदू असतो , हा शरीराच्या अवयवाचा अविभाज्य भाग आहे .
म्हणून त्याची दखल घ्यावी लागते .
अन्यथा मेंदूत बुद्धी असती तर , त्यांच्या कडून कोणतीही अंधश्रद्ध कृती 
होऊही शकली नसती .
 ज्या महिलावर्गावर तथागत गौतम बुद्ध , डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड विश्वास दाखविला , त्या महामानवांना आपण काय देत आहोत , याचा तसूभरही विचार या बुद्धिहीन अंध महिला करताना दिसत नाही ,
    जन्मभर बुद्धधम्म आमचा , तथागत बुद्ध , डॉ .  बाबासाहेब आंबेडकर आमचे , असे वरवर खोटे भासवीत जगताना या महिला थकत कशा 
नाहीत ? 
याचे आश्चर्य वाटते , शिवाय हिंदूंची कर्मकांड करताना हिंदू स्त्रियांच्या चेष्टेचा त्या विषय ठरतात ते वेगळेच . कारण स्वतःची जात , धर्म या गोष्टी स्वार्थासाठी फक्त तुम्ही विसरू शकता , बाकी जग तुम्हाला त्याच 
चष्म्यातून पाहत असते .

बुद्ध धम्मातील गद्दार स्त्रियांनो ,

हिंदू धर्म इतकाच आवडत असेल तर एकदा धाडस करून बघाच ,
जाहीरपणे हिंदू धर्म स्वीकारा .
फक्त स्वतः शी बेईमान होत स्वतः चीच जन्म भर फसवणूक करू नका .
    आमचे अशा , गद्दार स्त्रियांना जाहीर आव्हान आहे कि , आव आणून हिंदू झालेल्या प्रत्येक दिखाऊ स्त्री ने हिंदू धर्मातील धर्ममार्तंडांना सांगून ,
हिंदू धर्मात प्रवेशाचे धाडस करावे .
पण गम्मत अशी आहे कि , कोणताही धर्म मार्तंड अशा गद्दारांना आपल्या धर्मात घेणार नाही ।

हिंदू धर्मात यांची काय लायकी आहे , हे त्यांना कळेल ...

हिंदू [ ब्राह्मण ] म्हणून तर भारतातील एकही व्यक्ती त्यांना न्याय देऊ ,
शकणार नाही .
          लपून - छपून हिंदू धर्मातील सणोत्सव साजरे करताना हे ,
विसरू नका कि , 

आज निर्ढावून वागण्यामध्ये तुमचे योगदान काय ? काहीही नाही ..

जेव्हा देव - देव करण्याचा अधिकारच तुम्हाला नव्हता , तेव्हा तो हक्क 
मिळावा यासाठी तुम्ही कोणता लढा उभारला ? मंदिर प्रवेश बंदी असतांना मंदिरप्रवेशासाठी तुम्ही काय केले आहे ? काहीही नाही .

  लक्षात ठेवा गद्दाराला प्राण गेला तरी कुणी प्रामाणिक म्हणत नाही .
गद्दार तो गद्दाराच्या  !

मुळात विश्वास काय असतो ? तथागत बुद्धांनी , डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त शाब्दिक तर म्हटले आहे कि ,
स्त्री शक्तीवर माझा विश्वास आहे .

आज  ,
डॉ .बाबासाहेब आंबेडकर  थोडीच आहेत माझा विश्वासघात पाहायला .
दुसरं म्हणजे तथागत बुद्ध तर , आमच्या या विश्वासघाताला कोणतीहीशिक्षा देऊ शकत नाहीत .
कारण ते कोणताही चमत्कार करत नाहीत . 
हीच ती करणे आहेत , या विश्वासघातास कारणीभूत ठरत आहेत .
शिवाय ,
आम्ही काय करायचे हे सांगणारे   तुम्ही कोण , हे अज्ञान शरीराला गळू 
सारखे चिकटून बसले आहे , ते वेगळेच .

गद्दार बौद्ध महिलांनो , 
असे वागून तुम्ही केवळ तथागत बुद्ध , डॉ , बाबासाहेब आंबेडकरांचीच नव्हे , तर तुमच्या येणाऱ्या पिढ्यांचीही फसवणूक करीत आहेत .
सर्वांगसुंदर धम्मात असतानाही केवळ स्वार्थापोटी तुम्ही धम्माशी , डॉ . बाबासाहेबांशी प्रतारणा करत जगयालात यासाठी पुढची पिढी तुम्हाला माफ करणार नाही .
हा तोच धम्म आहे . ज्याने तुम्हाला कर्मकांडाच्या गुलामगिरीतून बाहेर काढले .
 स्वातंत्र्याचा श्वास दिला ,
 ज्याने कधीही तुमची फसवणूक केली नाही .
 आधी अमुक - अमुक करा , मग तमुक मिळेल , असे कधीही ना संपणारे प्रलोभन दिले नाही .

कुणी तुमची युगांयुगाची गुलामगिरी संपिवली असेल तर ,
 त्या प्रति तुम्ही कृतज्ञ राहाल कि कृतघ्न
कुणी तुमच्यावर डोंगराएवढे उपकार केले असतील तर , त्याची परतफेड तुम्ही उपकाराने कराल कि अपकाराने ?
    जन्मभर आपल्या अपत्यांची काळजी वाहिल्यावर , त्यांनी तुमच्या उपकारांची , कष्ठाची जाण ठेवली नाही तर ? 
तर आपल्याला अतीव दुःख होते . संपूर्ण जन्मच वाया गेला असे वाटते .

या अपत्यांसाठी निःस्वार्थपणे आपण काय - काय केलय हे सतत डोळ्यासमोर येते .

ज्याप्रमाणे  आपल्या अपत्याने आपले ऐकावे , त्यातच त्यांचा उत्कर्ष आहे असे तुम्हाला वाटते ,
तद्वतच धम्माच्या वाटेवर आपण चालावे , त्यातच तुमचा उत्कर्ष आहे ,
असे तथागत भगवान बुद्ध आणि डॉ , बाबासाहेबांना वाटले .

म्हणूनच स्त्री शक्तीवर त्यांनी अपार विश्वास दाखवला .
त्यांचा विश्वास वाया जाऊ देऊ नका ,

म्हणूनच महिलांनो ,
धम्म आपली अनिवार्य जबाबदारी आहे ! 

हे ओळखा ।।


पूर्व प्रसिद्ध : दै सम्राट ४ ऑक्टो २०१९



No comments