राज्यात ५५ टक्के मतदान !
इव्हीएम बिघाडामुळे अनेक मतदार मतदानापासून वंचित . बूथ कॅप्चरिंगचा आरोप , उमेदवारावर गोळीबार , मारहाण .
मुंबई , दि २१ - महाराष्ट्र विधानसभेसाठी सोमवारी पार पडलेल्या मतदानादरम्यान राज्यातील अनेक भागात मतदान यंत्रणात बिघाड झाला . मतदान यंत्रातील दोष , दूर न झाल्यामुळे हजारो मतदारांना मतदानापासून वंचित रहावे लागले . विधानसभा निवडणुकीदरम्यान राज्यात अनेक ठिकाणी मारहाणीच्या घटना घडल्या , अमरावती जिल्ह्यातील मोशी - वरुड मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटना व महाआघाडीचे उमेदवार देवेंन्द्र भुयार , यांच्यावर गोळीबार करून त्यांची गाडी पेट्रोल टाकून जाळण्यात अली . देवेंद्र भुयार हे भाजपचे उमेदवार अनिल बोंडे यांच्या विरोधात लढत आहेत . बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव बूथ कप्च्युरींग झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेसच्या उमेदवाराने केला आहे . दरम्यान राज्यात सायंकाळी ६ वाजेपर्यंत एकूण ५५ टक्के मतदान झाले .
जागृत मतदार ,
बारामती तालुक्यातील कांबळेश्वर येथे जोरदार पाऊस झाल्याने मतदान केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणात चिखल झाला . त्यामुळे जागृत मतदारांनी सहा ट्रॅक्टरच्या ट्रॉल्या एकमेकांना जोडून मतदान केंद्रात जाण्यासाठी पूल तैयार केला .
No comments