पाकिटं पोहचली का ?
जनाची नाही , निदान मनाची तरी लाज असुद्या ;
मुंबई , दि २० ऑक्टो ; conform : १६८ चांदिवली विधानसभा क्ष्रेतात कालपासून , मतदारांना दोन - दोन हजाराचे पाकिटं पोहचविण्याचे महान कार्य , तेथील लाचार , स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवणारे , विशेष स्वतःला कट्टर आंबेडकरवादी म्हणविणारे कार्यकर्ते , करताना दिसत आहेत ।
ते तर त्यांच्या मालकाचे , कुत्रे आहेत ,
पण मतदार , त्यातच कट्टर आंबेडकरवादी , अशी पाकिटे घ्यायला .. घरात काय खायला मिळत नाही का ? असा प्रश्न निर्माण होतो ,
आणि मग कुठल्या , तोंडाने जयभीम म्हणता ,
अश्या दीड दमडीच्या पायी , माजा समाज विकणार नाही ।
बिचारा , आनंद शिंदे घसा वरडुन - वरडुन गाणी म्हणतो , आपण ती ऐकत आलोय आणि त्या वर नाचतही आलोय ,
मग का ? नेमक्या निवडणुकीच्या , दोन दिवस अगोदर तुमचा , स्वाभिमान , डगमग तो ?
गळ्यातील मडकं आणि कंबरेचा झाडू , परत येणारनाही असे , जर तुम्हाला वाटत असेल ना , मग तो तुमचा गैरसमज आहे . हे लक्षात ठेवा बांधवानो ।।
तुमचे मतदार यादीत नाव आहे म्हणून तुम्हाला पैसे वाटले जातात ,
पण उद्या ,तुमचा मतदानाचा अधिकारच , जो तुम्हा - आम्हाला ज्या घटनेच्या माध्यमातून मिळालायना , ती घटनाच फाडून , तुम्हाला पुन्हा गुलामीची , लाचारीची जिंदगी देण्याची तैयारी , २००३ पासून केंद्रातील भाजप सरकार आणि आत्ताची महाराष्ट्रातील फडण २० , सरकार करीत आहे ,
दिल्लीच्या राजकारणात आमच्या विरुद्ध , कट रचले जात असताना मी गल्लीच्या राजकारणात दंग होतो ! मला माफ करा ,
बांधवानो , केंद्रात जेव्हा भाजप चे प्रथम सरकार आले ना , त्या वेळेस २००३ मध्ये , आपल्या देशाची राज्यघटना बदलण्याची प्रक्रिया सुरु झाली , हि घटना जुनी झाली आहे , तिला आता बदलले जाईल , अशी घोषणा त्या वेळेस , केली गेली .
व , प्रतक्षय त्याची कृती करण्याकरिता ११ जणांची समिती हि गठीत करण्यात अली ,
त्यात , शारदपवारांना दक्षिण भारतात ज्यांच्या मुळे आपल्या पक्षाला राष्ट्रीय मान्यता मिळाली , ते पक्षाचे नेते पी . ए संगम यांचे नातेवाईक नदीम रिझवी , ते त्या समितीचे सदस्य होते .
बाबासाहेबांच्या घटनेला , कोण हात लावेल ! एक - एक कांचे हातपाय तोडून टाकू ,
अशी बोम्ब , नुसती बोम्ब आम्ही इथले ,
महाराष्ट्रातले पाईक भीमाचे करीत होतो ,
रामदास आठवलेंच्या नेतृत्वात , कुर्ला चुनाभट्टी येथे संविधान क्रांती मोर्चा चे आयोजन , त्या वेळेस केले होते .
आणि त्या कार्यक्रमाच्या उदघाटन करिता , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आयु : शरद पवार होते ,
म्हणजे , ज्यांच्या पक्षातील सदस्य , तिथे आमची घटना फाडायच्या तयारीत होते , ते आमचे प्रमुख पाहुणे .
त्या वेळेस , भाजपला संपूर्ण बहुमत नसल्याकारणाने ,
व ज्यांना आपण , भैये म्हणवून हिणवत असतो , ते यु . पी , एम . पी चे भैये यांनी मा . कांशीरामजी यांच्या नेतृत्वात संपूर्ण भारतात संविधान समीक्षा रॅली च्या माध्यमातून , भाजप चा डाव हणून पाडला ,
भाजपला स्पस्ट बहुमत मिळविण्या करिता फक्त दोन राज्य काबीज करायची आहेत , ती म्हणजे महाराष्ट्र आणि बिहार .
या दोन्ही मधील एक राज्य जरी भाजप ने आताच्या , निवडणुकीत म्हणजे २०१९ ची विधानसभा निवडणुकीत काबीज केले ना ,
तर केंद्रात त्यांना स्पस्ट बहुमत मिळेल ,
आणि एकदा का , स्पस्ट बहुमत मिळाले , तर भाजप मोकळी . २०२५ नंतर तर , देशात कधीच निवडणूक होणार नाहीत याची , अंतर्मनाने नोंद घ्यावी .
लोकशाहीच जर , संपुष्ठात आली तर ,
गळ्यात गोल्डन पॉट , आलेच म्हणून समजा !
त्याच साठी तर ,
तिकडे बिहारी बाबूंनी , मायावतींच्या नेतृत्वाखाली केंद्रातील भाजप सरकारचा डाव हाणून पाडण्याकरिता कंबर कसली आहे ,
आणि इकडे महाराष्ट्रातात आदरणीय : बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून , वंचितांचे राज्य निर्माण करण्याकरिता , बाळासाहेब जीवाचे रान करीत असताना ,
स्वतःला आंबेडकरवादी म्हणविणारे , आज बाबासाहेबांच्या रक्ताला ,
बेईमान होताना दिसत आहेत .
याद राखा ,
ज्या स्वाभिमानाने तुम्ही जगावे म्हणून , बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संसाराचा सुद्धा त्याग केला , त्या बाबासाहेबांच्या नातवाला , जो
तुमचा स्वाभिमान टिकून राहण्याकरिता धडपडतोय , त्याला गद्दार होऊन , तुम्ही कितपत , त्या मिळालेल्या , दोन हजाराच्या पाकिटावर आपला संसार चालविणार आहेत ?
जनाची नाही , निदान मनाची तरी जाण असुद्या :
आणि , खुळ्यांनो जे पाकिटे घेतलीत ना , ती आता असुद्या तुमच्याकडेच , आणि उद्या येणार्या २१ तारखेला , आदरणीय बाळासाहेबांनी ठरवून दिलेल्या आपल्या उमेदवारास , म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारास , निवडून आणून विधिमंडळास पाठवा ,
जे ने करून , केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारचा मनुवादी मेंदूने रचण्यात आलेला देशाला गुलामी कडे नेणारा डाव , हाणुन पडेल ..
२००३ पासून ते आताच्या २०१९ पर्यंत , किती षडयंत्र झालेत याचे ज्वलंत उधारण पाहायचे झाले तर , २०१८ भीमा - कोरेगाव दंगल प्रकरण ,
अतिशय पद्धतशीर पणे , २०० वर्ष पूर्ण होत असलेल्या ५०० महारांच्या शूर गाथेस , दंगलीच्या माध्यमातून गाल बोट लावून , दंगल खोरांवर खटले दाखल करण्या ऐवजी , आंदोलकांवरच दंगलीचे गुन्हे दाखल करणारे सरकार कुणाचे , हे अजून हि तुम्हाला ओळखता नाही आले , तर नवलच .
जाता - जाता इतकेच म्हणेन ।।
जयभीम के नारे पे ,
खून बहे , तो बहने दो ,
खून हमारा खोलता नही ,
और उसमे , एक भी कत्रा भीम नाम का मिलता नही ।
जय भीम ।।
टीप :तेथील स्थानिक कार्यकर्त्याने , आपले नाव न , सांगण्याच्या अटीवर सदरहू माहिती पोहचवली आहे , याची वाचकांनी नोंद घ्यावी ।
No comments