दारू पिणारा आणि पाजणारा उमेदवार नको ! गडचिरोलीत ग्रामसभेत ठराव

Share:

दारू पिणारा आणि पाजणारा उमेदवार नको ! गडचिरोलीत ग्रामसभेत ठराव  

गडचिरोली , दि ३ - विधानसभा निवडणुकीतील दारूचा वापर टाळण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातल्या १२० ग्रामपंचातीमधील २८७ गावांनी ग्रामसभेत ठराव घेतला आहे . त्यात दारू पिणारा आणि पाजणारा उमेदवार नको ,अशी मागणीवजा अपेक्षा राजकीय पक्षांकडे केली आहे ,

          गडचिरोलीत गेल्या तीन वर्षा पासून राबविल्या जात असलेल्या मुक्तिपथअभियानाच्या पुढाकारातून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात करण्यात आलेल्या  जनजागृती मुळे , नागरिकांना दारूचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत .
त्यामुळे आतापर्यंत ६०० गावांनी दारूबंदीचा ठराव घेऊन गावात दारूला ठार ना देण्याचा निर्णय घेतला आहे , त्यापैकी १२० ग्रामपंचायतींनी विधानसभा निवडणूकसुद्धा दारूमुक्त वातावरणात  पारपाडावी , या साठी ग्रामसभेचा ठराव घेतला असल्याची माहिती

जेस्ट समाजसेवक डॉ । अभय बंग यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली .


Also read : दीड कोटींच्या दारूवर बुलडोजर !     

चंद्रपूर , दि ,३ - जिल्ह्यात मागील पाच वर्षांपासून दारूबंदी आहे , त्यानंतर हि दारूची चोरटी वाहतूक आणि विक्री सुरु आहे .  त्या मुळे पोलीस विभागाकडून दारूविक्रेत्यांविरुद्ध विशेष मोहीम सुरु आहे , रामनगर पोलिसांनी मागील तीन वर्षात अनेक कारवायांतून कोट्यवधींचा  दारूसाठा नष्ट करण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली , न्यायालयाने मंजुरी दिल्यानंतर एक कोटी ४७ लाखांच्या दारूसाठ्यावर बुलडोजर चालवून नष्ट करण्यात आला .
       
  दारूबंदीनंतरही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होत आहे . दररोज लाखो रुपये किमतीची दारू , जिल्ह्यात विविध मार्गाने येत आहे , पोलीस विभागाकडून दारू तस्करांवर कारवाया केल्या जात आहेत ,

यानंतरही माफियांकडून वेगवेगळ्या क्लुप्त्यांचा वापर करून दारू जिल्ह्यात आणली जात आहे . रामनगर पोलिसांनी गेल्या दोन - तीन वर्षात दारू विक्रेत्यांविरुद्ध कारवाही करताना कोट्यवधींचा दारूसाठा  जप्त केला , रोजच्या कारवाही मुळे पोलीस विभागाकडे मोठ्या प्रमाणात  दारूसाठा गोळा झाला आहे ,

अनेक पोलीस ठाण्यात जप्त  दारूसाठा साठवून ठेवण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे . दरम्यान रामनगर पोलिसांनी जप्त दारूसाठा नष्ट करण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली होती .

 न्यायालयाच्या परवानगीनंतर एक कोटी ४७ लाखांचा दारूसाठा नष्ट करण्यात आला . नागपूर मार्गालगत असलेल्या एमआयडीसी परिसरात दारूसाठ्यावर  बुलडोजर फिरविण्यात आले .                      

No comments