संसदीय सत्तापदांसाठी साधू - संतांत साठमारी !
भारतीय राष्ट्रवाद व सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या द्वैतातून बेगडी धर्मनिरपेक्षता आणि विवेक शून्य
धर्मांधतेने सांप्रदायिक वळण घेतले आहे .
या दोन्ही छावण्यांतून राजकीय सत्ते साठी संन्याश्यांशी समझोता करण्यासाठी जी साठमारी चालली आहे , त्यामुळे धर्मसत्ताच बलवान होत असून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी हिंदुत्वादी व धर्मनिरपेक्षतावादी शक्ती जीव तोडून कामाला लागल्या आहेत .
जे धर्माभिमुख नाहीत वा धर्माधही नाहीत , अश्या मध्यमवर्गीय भारतीय समाजाची चिंता करायला मात्र कुणालाच वेळ नाही ...
कारण बहुतेक राजकीय पक्ष ,
बहुसंख्याकवादी , अल्पसंख्याकवादी , जात - जमातवादी आहेत , त्यांना राष्ट्रापेक्षा स्वपक्षाचीच चिंता अधिक आहे .
सिंधू संस्कृतीतील मूळनिवासीयांचे ज्ञान , विज्ञान व कला इत्यादींची उचल करून आर्याच्या वैदिक संस्कृतीने आपला प्रपंच उभा केला आहे .
मुक्ती [ मोक्ष ] साठी चेतविलेल्या चैतन्याने संप्रदायांची शक्ती उभी केली । मध्ययुगीन संतांनी पिठात आणि मठात अडकलेल्या ब्राह्मणी शक्तीला लगाम घालून भक्तीची पताका फडकावली ..
गट बाराशे वर्षाच्या इतिहासात मुक्ती शक्ती , भक्ती या त्रयीने धर्मक्षेत्रात जे चिंतन केले , जी चेतना जागवली त्यातून अनेक संप्रदाय पंथ उदयाला आले .
त्यांनी वैयक्तिक मुक्ती आणि लोककल्याणासाठी भारतीय जीवनात मोठे योगदान दिले .
शैव व वैष्णव हे हिंदू धर्मातील दोन मुख्य प्रवाह आहे , त्यांचे अनेक संप्रदाय व अनेक एखादे आहेत ,
गोरखपंथी , कबीर पंथीय व दादू पंथींय यांचे हि संप्रदाय व आखाडे आहेत , याशिवाय आणखी हि छोटे मोठे संप्रदाय , पंथ आणि आखाडे आहेत .
मूळ पंथातून अनेक शाखा आणि उपशाखा उपजल्या आहेत .
आज एकट्या कबीर पंथाच्या दोनशेपेक्षा अधिक शाखा सक्रिय आहेत ,
बहुतेक सर्वेच पंथ , आखाड्यांकडे प्रचंड कल , अचल संपत्ती आहे .
साधू , संत - महंत , मंदिरे , धर्मपीठे यांच्या मिळकती आणि मालमत्ता
नेहमीच चर्चेचा विषय होत आला आहे ।।
भारतीय समाजात साधू समाजाची लोकसंख्या जवळ - जवळ एक करोड असावी . त्यांचे नेतृत्व परमहंस , मंडलेश्वर , महामंडलेश्वर ,महंत करीत असतात .
कुंभ मेळा आणि सिंहस्थदि पर्वात या साधू शक्ती चे प्रचंड दर्शन , प्रदर्शन समाजाला पाहायला मिळते .
स्नानासाठी ते तेव्हा मिरवणुकीने निघतात , तेव्हा एखाद्या चतुरंगी सेने प्रमाणे त्यांच्या आखाड्यांची रचना केलेली असते ।
त्यात हत्ती , घोडे , उंट , झेंडे , पताका आणि शस्त्रधारीही असतात .
अश्या कुंभ व सिन्हास्तदींच्या कर्मकांडावर सरकार दरवेळा अरबो रुपय खर्च करीत आले आहे ,
केंद्रात वाजपेय सरकार आल्यानंतर तर ,
मंदिरांवर आणि महंतांवर , सिंधू संन्याश्यांवर खैरात करण्याचा मार्ग अधिकच प्रशस्त झाला .
लालकृष्ण अडवाणी गृहमंत्री असताना ,
हिंदू धर्माला
हितावह ठरणाऱ्या लवकीक कल्याणाचे कार्य करण्यासाठी सोमनाथमंदिराला पाच करोड रुपयांचे आर्थिक साहाय्य करण्यात आले होते .
त्याच वेळी रा . स्व संघाशी संबंधित पाचशे संस्थांना एफ . सि . आर . ए . जारी करण्यात येऊन त्यांच्या साठी परदेशातून मदत मिळविण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला होता .
त्यावेळेस उत्तरप्रदेशा चे तत्कालीन मुख्यमंत्री गुप्त यांनी लखनौत भाउराउ देवरस न्यासाला पाच हजार वर्ग मीटर बहुमूल्य भूखंड ,
केवळ १ रुपया वार्षिक शुल्कावर ३० वर्ष्यासाठी देण्यात आला होता ..
त्याची किंमत अडीच कोटी रुपये होती .
बाबरी बर्बादीचे मुख्य आरोपी साध्वी ऋतंभरा यांना वृंदावन मथुरा मार्गावर परम शक्ती पीठ आश्रम निर्माणासाठी ४३ एकर १५ गुंठे जमीन बहाल करण्यात आली होती ।।
बाजारात या जमिनीची किंमत १५ कोटी रुपये होती ।
संत विजय कौशल जे पूर्वी संघाचे कार्येकर्ते होते ,
त्यांना वृंदावनात विधवांची सेवा करण्यासाठी एक कोटीचे अनुदान देण्यात आले होते .
सर्वच सरकारांनी अशी दाने , अनुदाने दिलेली आहेत ..!
हे औदार्य संतांना , संस्थांना उपकृत करून त्यांना आपल्या राजकीय
पंखा खाली घेण्यासाठीच देण्यात येतात , हे उघड आहे .
आमच्या धर्म चिंतकांनी संन्यासपेक्षा गहृस्थाश्रम महत्वाचा मानला आहे ,
कारण संन्यासी असला तरी , त्याला जीवनयापनासाठी समाजावरचा निर्भर राहावे लागते .
भारतात साधू , संतांचा एक समांतर समाज नांदत आहे ,
मुसलमान समाजात तो पीर - फकीरांच्या रूपाने ,
तर हिंदू समाजात योगी , तांत्रिक आणि भिक्षु हे हि स्वतःला साधुसंतांसारखेच दर्शवितात .
या साधू संतात हि ,
प्रादेशिकता व जातीयवाद या वरून अंतरसंघर्ष चालल्याचे दिसते .
अयोध्यातील बिहारींचे वर्चस्व वाढत आहे , अशी अयोध्यातील
साधूंची तक्रार आहे.
सांप्रत अयोध्येत साडेसहा हजारांवर मंदिरे आहेत /
वैश्य , स्वर्णकार , हलवाई , चौरसिया , खाटीक , निशाध , यादव , धोबी , हरिजन , नाई समाज , विश्वकर्मा , कुर्मी इत्यादी आदी शंकराचार्यांनी चार पिठांची स्थापना केली होती .
आज अनेक संत स्वतः शंकराचार्य असल्याचा दावा करू लागले आहेत .
भारत साधू समाजाचे महासचिव स्वामि हरिनारायणनंद यांच्या म्हणण्या नुसार शंकराचार्य असल्याचा दावा करणाऱ्यांची संख्या तीन डझन पेक्ष्या अधिक आहे ,
या वादातून अनेक खटले , दावे हायकोर्ट , सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहेत ,
द्वारका व ज्योतिपीठांचे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी विश्व् हिंदू परिषद नकली शंकराचार्य बनवीत आहे , असा आरोप केला आहे ,
शंकराचार्य चिन्मयानंद सरस्वती म्हणतात , भारतीय राजनीतीत संतांचा हस्तक्षेप नेहमीच होत आला आहे .
वास्तविक साधू संतांचे कार्य राजनीतीला दिशा निर्देश देण्याचे आहे ,
त्यांना शास्रानुकूल मार्गावर आणण्याचे आहे ,
परंतु दुर्दैवाने ,
आज राजनीतीत जे संत आहेत , ते राजकारण्यांच्या मार्गाने जात आहेत
हिंदुत्ववादी संत , महामंडलेश्वर डॉ । सचिदानंद हरी साक्षी महाराज तीन वेळा भाजप च्या तिकिटावर खासदार झाले आहेत ,
ते ऑपरेशन दुर्योधन मध्ये अडकले , तेव्हा समाजवादी पक्ष्याचे खासदार होते ।
रामजन्मभूमी मुक्ती यज्ञ समितीचे अध्यक्ष व गोरखनाथ मंदिराचे माजी महंत अवैद्यनाथ खासदार होते .
बाबरी बरबादी नंतर संघाने साधू संतात ,
धार्मिक उन्माद भडकावून त्यांचे धुवीकरण करण्याचा प्रयत्न चालविला आहे ।
धर्म संस्थेतील अनेक नामचीन संत मंत्री , खासदार , आमदार आहेत , होते व काही संसदेत जाण्यासाठी धडपड करीत आहेत ।।
संघ संप्रदाय साधू संतांचे राजनैतीकरण करून त्यांना ,
राम मंदिराच्या प्रश्नावर गरम करीत आहे ।।।
साधू संतात त्याची प्रतिक्रिया , मुसलमान व ख्रिश्चन धर्माविरुद्ध घुनात्मक व वैमनस्यभावी प्रचार होत आहे ।।
त्यांचा बाबरी , ते शबरी हाच प्रचार आणि प्रहार होत आहे ,
राम मंदिर आंदोलनात आकाराला आलेली ; धर्मसंसद ; सक्रिय झालेली आहे ।
संघाच्या चिथावणीने , हि धर्मसत्ता लोकसत्तेला आव्हान देण्याइतकी आक्रमक होत आहे ,
म्हणूनच उत्तरप्रदेशात मुख्यमंत्री गुप्ताने हिंदू मंदिराचे मठ आणि ट्रस्ट यांचे स्वामित्व परिसंपत्ती आणि विवाद यांचे सर्वेक्षण करण्याचा आदेश जरी करताच साधू , संत भडकले होते व त्यांनी भाजप , राष्ट्रीय स्वयंसेवक संघ , विहिंप आणि बजरंगदल हे हिंदू आणि साधू संतांच्या विरोधी आहेत ,
असे जाहीर करून त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली होती ,
.. रामजन्मभूमी विवादाचे सर्वसंमत समाधान करण्यासाठी शृंगेरी येथे ,
कांची पिठाच्या शंकराचार्या सह पाच हि शंकराचार्यांची बैठक झाली होती ,
त्यात अयोध्येत मंदिर बनविण्यासाठी जे मंडलेश्वर , संत महंत , साधू धार्मिक संघटन आणि लोक उत्सुक आहेत ,
त्यांनी प्रथम हे निश्चित करावे कि , जेणेकरून ते जाणता अजाणता
राजनैतिक संघटनांचे ; हत्यार ; होणार नाहीत .
संघ संप्रदायाने पाळले , पोसलेले नकली शंकराचार्या व धर्माचार्य आदी शंकराचार्यांहून मोठे नाहीत .
संघ त्यांच्या जन्मापासूनच सनातन धर्माला ख्रिश्चन आणि इस्लामच्या चालीवर संघटित आणि सीमित करण्याचा प्रयत्न करीत आला आहे ;
जे आदिशंकराचार्यानी केले नाही वा प्रचारिलें नाही , ते हिंदूंच्या वतीने
करण्याचे प्रचारण्याचे अधिकार संघ व त्याच्या संप्रदायाला नाहीत ,
असा या बैठकीत निष्कर्ष होता ...
संघ संप्रदायाने राजकारणात धर्म आणला ,
त्यानेच सन्यस्त संत महंतात राजकीय महत्वाकांक्षा निर्माण केली ।
संतांनी संघाच्या खासदार , आमदारांसाठी प्रचार केला , त्या बदल्यात
त्यांनी आपल्या मंदिर , मठ , आश्रमासाठी सोयी- सुविधा उपलब्ध करून घेतल्या ।।
संत महंतांच्या धार्मिक प्रचार आणि संघाची हिंदुत्ववादी , हिंदू राष्ट्रवादी विचारसरणी यांच्या गंगा - जमिनी संगमातून साधू समाजाचे एक नवे शक्तिकेंद्र उदयाला आले आहे ,
दुर्दैव असे कि ,
काँग्रेस पक्ष हि संघाच्याच पावलावर पाऊल ठेवून चालला आहे ,
मागे काँग्रेस च्या धेंडांनी सोनिया गांधी चे हिंदूकरण करण्याचा प्रयत्न
केला होता ,
परंतु सोनिया विदेशी असल्यामुळे त्यांना काशी विश्वनाथ मंदिराच्या
गर्भ गृहात प्रवेश मिळणार नाही अशी काशी विश्वस्त परिषदेने भूमिका घेतल्यामुळे अखेर सोनिया गांधींना माघार घ्यावीलागली होती ,
तरी हि धर्मसंस्थेतील साधू - संतांशी काँग्रेसशी नेहमीच जवळीक
राहत अली आहे ,
चंद्रास्वामी , धीरेंद्र ब्रह्मचारी ते सत्य साईबाबा पासून आसाराम , रामदेवबाबा पर्यंत बहुतेकांचे राजनेत्यांशी संबंध आहेत ,
धर्मसंस्थेचे लांगुनचालन करण्यात कुणीही कमी नाही ,
धर्मसत्तेच्या दारात , राजकीयसत्तेच्या स्वार्थापायी राजकीयपक्ष व नेते ,
नेहमीच याचक म्हणून उभे राहिले आहेत ,
म्हणूनच माध्यम मार्गीय भारतीय जनतेला कुणातरी एकाच्या पाठी ,
फरफटत जावे लागते ,
सध्यातरी मध्यममार्गी भारतीय समाजाची तीच नियती आहे ,
पूर्वपर्ससिद्धी २२ एप्रिल २००६ - सम्राट
संधर्भ : विशू काकडे - यांच्या सैंधव संहारकांची संस्कृती , या पुस्तिकेतून

Subscription & Newsletter
Subscribe for New Post Notifications
No comments