नवरंग उधळणार्या हिंदुस्थानी महिलांसाठी !

Share:

नवरंग उधळणार्या हिंदुस्थानी महिलांसाठी !

Life Sketch of Savitribai Phule – Timeline

भारत देशातील पहिल्या शिक्षिका , स्त्री मुक्तीच्या उद्गात्या , स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या , मराठी कवितेच्या जनक आणि रूढी - परंपरे विरुद्ध धीराने , धैर्याने व धाडसाने प्रखर आणि प्रभावी बंड पुकारणाऱ्या

महामाता सावित्रीमाई जोतीराव फुले ,

यांनी १ जानेवारी १८४८ रोजी स्त्री शिक्षणाचे बीज रोवून त्याला ,
कष्ठाचे , त्यागाचे , मेहनतीचे व कठोर परिश्रमाचे पाणी पाजले नसते
तर आजच्या भारतीय नारीला नवरंग उधळता आले असते काय ?

सावित्रीमाईंनी भारतात स्त्रियांसाठी पहिली शाळा काढली नसती ,

त्यांना साक्षर करून शिक्षणाने ज्ञानी केले नसते तर हिंदुस्थानी [ भारतीय नव्हे ] नारीला सर्व क्षेत्रात उतुंग भरारी मारता अली असती काय ?

स्त्री शिक्षणाचे म्हणजेच स्त्री विकासाचे नवे युग निर्माण करणाऱ्या फुले दाम्पत्याला विसरून अज्ञान , अंधश्रद्धा , कर्मकांड व मूर्ती पूजेत मग्न होऊन स्वतः [ संसार भग्न करणाऱ्या महिलांसाठी सावित्रीमाईंचे विचार पुढील प्रमाणे ]

;; उद्योग या विषयावर त्या म्हणाल्या कि ,
; उद्योग याचा अर्थ सदासर्वकाळ मेहनत करणे होय । 
; उद्योग हा मानवाचा परम मित्र असून , आळस हा त्याचा शत्रू आहे ।
।।। देव हा काल्पनिक आहे ।
तो सत्य नसून बेभरंवशाचा आहे । तो मानव व उद्योग यात भेद पाडुन,
त्यांच्यात शत्रुत्व उत्पन्न करतो आणि माणसाला आळशी बनवतो ।

देव , दैववाद  आणि कर्मकांडावर प्रहार करताना ,

सावित्रीमाई म्हणतात -


धोंडे मुले देती । नवस पावती 
लग्न का कर्ती  । नरी नर ? 


आभार : दै वृत्तरत्न सम्राट  रविवार दि । २९ सप्टेंबर २०१९ चा अंक


No comments